For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाबरकडे पुन्हा नेतृत्व देण्यास पीसीबी उत्सुक

06:28 AM Mar 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
बाबरकडे पुन्हा नेतृत्व देण्यास पीसीबी उत्सुक
Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisement

माजी कर्णधार बाबर आझमकडे पुन्हा वनडे क्रिकेटसाठी पाक संघाचे कर्णधारपद सोपविण्यास पीसीबीने उत्सुकता दाखविली आहे. दरम्यान बाबर आझमने यासंदर्भात आपला कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे समजते.

पाक संघाच्या प्रशिक्षकांची नियुक्ती करताना पीसीबीने कर्णधाराच्या मताचा विचार करावा, अशी अट बाबर आझम घालेले असे वाटते. यापूर्वी बाबर आझमकडे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारासाठी पाक संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. क्रिकेटच्या या तिन्ही विविध प्रकारासाठी स्वतंत्र कर्णधारांची नियुक्ती केली जावी, असे मत पाकच्या माजी क्रिकेटपटूंनी तसेच निवड सदस्यांनी व्यक्त केल्याचे समजते. मोहम्मद युसूफ, आसद शफिक, अब्दुल रझाक आणि वहाब रियाझ त्याचप्रमाणे माजी मंत्री बिलाल अफजल यांच्याकडून या संदर्भात वैयक्तिक मते देण्याचे पीसीबी प्रमुखांनी सांगितले आहे. त्यानंतरच आपल्याला कर्णधाराबाबत बोलावले जाईल, असा खुलासा बाबर आझमने केला आहे. सध्या पाक कसोटी संघाच्या कर्णधारपदी शान मसुदची नियुक्ती करण्यात आली आहे. पाक संघासाठी विदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याबाबत पीसीबीने अंतिम निर्णय घेतलेला नाही. विदेशी प्रशिक्षक अॅडॅम व्होगेस, लुक राँची, शेन वॅटसन, माईक हेसन यांच्याशी पीसीबीने प्रशिक्षकाबाबत चर्चा केली. पण या विदेशी प्रशिक्षकांनी स्पष्ट नकार दर्शविला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.