कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘पी अँड बी’चा समभाग घसरणीत

06:14 AM Aug 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पी अँड बी हाऊसिंग फायनान्सचा समभाग शुक्रवारी शेअरबाजारात 15 टक्यापर्यंत खाली आला होता. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ गिरीश कौसगी यांनी राजीनामा दिल्याचे निमित्त होऊन त्याचा परिणाम समभागावर शुक्रवारी पाहायला मिळाला.

Advertisement

शुक्रवारी शेअरबाजारात फक्त पी अँड बी हाऊसिंगचीच चर्चा दिसून आली. कंपनीचे सीईओ गिरीश कौसगी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपला कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच त्यांनी राजीनामा दिल्याची त्याची चर्चा रंगली. ऑक्टोबर 2022 मध्ये ते कंपनीत रुजू झाले होते. कौसगी यांच्या कार्यकाळात पी अँड बी हाऊसिंग फायनान्सचा समभाग 200 टक्के इतका वाढला होता. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर मात्र समभाग इंट्राडेदरम्यान बीएसईवर 15 टक्क्यापर्यंत घसरत 833 या भावावर व्यवहार करत होता. राजीनाम्यानंतर कंपनीने मंडळाला पूर्ण विश्वास आहे की सध्याची टीम, कौसगी यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची कामगिरी करत असून यापुढेही कंपनी विकास साध्य करण्यासाठी आघाडीवर असेल. लवकरच नव्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article