महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘पेटीएम’चा तिमाही तोटा 228 टक्क्यांनी वाढला

06:50 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वन 97 कम्युनिकेशन्सला आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिमाहीत 550 कोटींचा फटका

Advertisement

मुंबई :

Advertisement

पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्सला आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत वार्षिक आधारावर 550 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत म्हणजेच 2022-23 मध्ये ही तूट 167.5 कोटी रुपये होती. म्हणजेच कंपनीच्या तोट्यात 228 टक्के वाढ झाली आहे.

कंपनीच्या महसुलातही घट झाली आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत पेटीएमचा महसूल 2,267 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत महसूल 2,334 कोटी रुपये होता. म्हणजेच चौथ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात वार्षिक 3 टक्के घट झाली आहे.

कंपनीच्या तोट्यात 19 टक्के घट

तथापि, 2022-2023 च्या तुलनेत संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनीचा तोटा कमी झाला आहे. पेटीएमला 2023-24 मध्ये 1,422.4 कोटी रुपयांचा तोटा झाला. 2022-2023 मध्ये ता 1,776.5 कोटी रुपये होता. म्हणजेच तोटा 19 टक्के कमी झाला आहे. दरम्यान संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीच्या महसुलात वाढ झाली आहे. 2023-24 मध्ये, पेटीएमने व्यवसायातून 9,977.8 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article