कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘पेटीएम’ला सेबीकडून 1.11 कोटींचा दंड

06:04 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सीईओ विजय यांना ईएसओपी घेण्यापासून 3 वर्षांची बंदी 

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

ईएसओपी (कर्मचारी स्टॉक ऑप्शन्स) प्रकरणात तोडगा म्हणून सेबीने पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांना 3 वर्षांसाठी नवीन ईएसओपी घेण्यापासून बंदी घातली आहे. यासोबतच, वन97 ने जारी केलेले ईएसओपी रद्द करण्यात आले आहेत. सेबीने पेटीएम आणि विजय शेखर दोघांनाही 1.11 कोटींचा दंड ठोठावला आहे. याशिवाय, कंपनीचे सीईओ अजय शेखर शर्मा यांना 57.11 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अजय यांना ईएसओपीमधून 3,720 समभाग विकून मिळवलेले 35.86 लाख रुपये परत करावे लागतील.

 विजयने 2.1 कोटी ईएसओपी परत केले

यापूर्वी 16 एप्रिल रोजी विजय शेखर शर्मा यांनी 2019 मध्ये 21 दशलक्ष म्हणजेच 2.1 कोटी कर्मचारी स्टॉक पर्याय (ईएसओपी) परत केले होते. शेअर-आधारित कर्मचारी लाभ देण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सेबीने 2024 मध्ये कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ऑगस्ट 2024 मध्ये, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने म्हटले की विजय शेखर शर्मा यांना 2.1 कोटी कर्मचारी स्टॉक पर्याय (ईएसओपी) देण्याने शेअर-आधारित कर्मचारी लाभ नियंत्रित करणाऱ्या त्यांच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. भारतीय नियमांनुसार, कंपनीच्या निर्णयांवर प्रभाव पाडण्याची क्षमता असलेल्या मोठ्या शेअरहोल्डर्सना ईएसओपी ठेवता येत नाहीत.

कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन (ईएसओपी) ही एक योजना आहे ज्यामध्ये कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना कंपनीचे शेअर्स ऑफर करते, बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article