For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेटीएम बँकेचे सीईओ चावला यांचा राजीनामा

06:17 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
पेटीएम बँकेचे सीईओ चावला यांचा राजीनामा
Advertisement

पेटीएमला आणखी एक झटका

Advertisement

नवी दिल्ली :

पेटीएम पेमेंट्स बँक मागील अनेक दिवसांपासून अडचणीत आहे. आता कंपनीला आणखी एक धक्का बसला आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुरिंदर चावला यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला बँकिंग नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कठोर प्रतिबंधात्मक कारवाईचा सामना करावा लागत असताना अशावेळी चावला यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे पेटीएमच्या अडचणी वाढलेल्या आहेत.

Advertisement

का दिला राजीनामा?

पेटीएम ब्रँड चालवणारी कंपनी वन97 कम्युनिकेशन्सने मंगळवारी या राजीनाम्याची माहिती शेअर बाजाराला दिली. कंपनीने म्हटले आहे की, पीपीबीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरिंदर चावला यांनी 8 एप्रिल 2024 रोजी वैयक्तिक कारणांमुळे आणि करिअरच्या चांगल्या संधी शोधण्यासाठी राजीनामा दिला. चावला गेल्या वर्षी जानेवारीतच पीपीबीएलमध्ये सामील झाले होते. परंतु त्यांच्या कार्यकाळात नियामक मानकांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे, पीपीबीएल अलीकडेच आरबीआयच्या कठोर निर्देशांखाली आले.

या ब्रोकरेजने रेटिंग केले कमी

बँक ऑफ अमेरिकाच्या मते, पेमेंट व्यवसाय सध्या पेटीएम कंपनीसाठी खूप स्पर्धात्मक बनला आहे. कंपनीचे मार्च तिमाहीचे उत्पन्नही कमकुवत राहण्याची अपेक्षा आहे. बँक ऑफ अमेरिकाचा असा विश्वास आहे की पेटीएम कंपनीला तिची कमाई आणि री-रेटिंग पुनर्प्राप्त करण्यासाठी सुमारे दोन ते तीन तिमाही लागू शकतात. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीतील कंपनीचा नफा अंदाजापेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.