महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फक्त सीमेवर जाऊन लढणे म्हणजे देशभक्ती नव्हे

05:47 PM Nov 26, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांचे प्रतिपादन ; कुडाळात २६ / ११ हल्ल्यातील जवानांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना

Advertisement

वार्ताहर/ कुडाळ
देशभक्तीची जाणीव ही विद्यार्थी दशेपासून सुरु होते. यासाठी सर्वांनी विद्यार्थी दशेत मेहनत घेतली पाहिजे. देशभक्ती म्हणजे सीमेवर जाऊन लढणे नाही. तर आपण वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ज्या क्षेत्रात जाणार आहोत, त्या क्षेत्रात आपली सुशील उंची गाठणे म्हणजे देशसेवा असते. देशभक्तीचा पाया हा विद्यार्थी दशेतच मजबूत केला पाहिजे. व्यसनापासून दूर राहून वेळेचा सदुपयोग करण्याची सवय विद्यार्थ्यांच्या अंगी बाणविणे गरजेचे आहे, असे आवाहन कुडाळ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी येथे केले.

Advertisement

कुडाळ एम-आयडीसी येथील बॅ.नाथ. पै शिक्षण संस्थेत मुंबई मधील २६/११ च्या दहशवादी हल्ल्यात शहीद जवानांना आणि निरपराध नागरिकांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.व्यासपीठावर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, सीईओ अमृता गाळवणकर, डॉ. व्यंकटेश भंडारी, हेड कॉन्स्टेबल संजय कदम, कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष आनंद मर्गज व विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य, प्राध्यापक शिक्षक उपस्थित होते.

मुल्ला म्हणाल्या, "मुंबईवर झालेल्या २६/ ११ चा हल्ला हा भीषण हल्ला होता. संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. परंतु या भीषण हल्ल्याला आपल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी सडेतोड उत्तर दिली. दहशतवाद्याना कंठस्नान घातले. या भीषण हल्ल्यात अनेक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना वीरमरण आले. त्या दिवशी या सर्व अधिकारी व पोलिसांनी आपल्या प्राणाची बाजी लावून कसाबसारख्या दहशतवाद्याला जिवंत पकडून मुंबईचे संरक्षण केले.

डॉक्टर, इंजिनीयर, नर्स, वकील, शिक्षक, कर्मचारी यांच्या माध्यमातून आपण देशाची सेवा करू शकतो. ही सुद्धा देशभक्ती आहे. थोडक्यात आपली प्रत्येक कृती आपले प्रत्येक कार्य देशाच्या प्रगतीसाठी निष्ठेने अर्पण केले पाहीजे. असे त्यांनी सांगितले.संविधान दिनाबद्दल मुल्ला म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची जी उद्देशिका तयार केली, त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे‌. आपला देश हा विविध जाती धर्मामध्ये विभागला आहे. स्वातंत्र्य, समता ,बंधुता धर्मनिरपेक्षता ही मूल्ये जतन करणे हे आपले कर्तव्य आहे . त्यातच देशाचा विकास ,प्रगती लपलेली आहे. एनसीसी दिनाबद्दल त्या म्हणाल्या, "एनसीसी एक त्यागाचे प्रतीक आहे. ज्या माध्यमाद्वारे आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची शिस्त, देशप्रेम, त्यागाची शक्ती संचारते व आपण देश सेवा करण्यासाठी तयार होतो. यात एनसीसीचा जो युनिफॉर्म आहे; तो युनिफॉर्म आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतो. असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले. तर 26 /11 च्या घटनेची क्षणचित्रे, संविधान दिन व एनसीसी दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक योगिता शिरसाट-तिळवे यांनी केले. एनसीसीचे महत्व मेता जमदाडे हिणे सांगितले. तर आभार विभा वझे यांनी मानले.

 

Advertisement
Tags :
# tarun bharat news # kudal #
Next Article