For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन द्या

10:30 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन द्या
Advertisement

जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची बैठकीत सूचना

Advertisement

बेळगाव : कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देणे थांबवावे. प्रत्येक महिन्याला वेळेमध्ये वेतन देण्यात यावे, अशी सूचना जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. जुन्या जिल्हा पंचायतीच्या सभागृहामध्ये मंगळवारी लिंक डॉक्युमेंट योजनेबाबत आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एजन्सींसाठी निविदा बोलविल्या जातात. यावेळी सदर एजन्सींनी यापूर्वी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊनच काम करावे. कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची संधी देवू नये. इएसआय, इपीएफ नियमानुसार वेतन दिला जात आहे की नाही? याची पाहणी करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींचा काळ्यायादीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना केली.

बेळगाव विभागात चार, चिकोडी विभागात तीन आयुष्यमान रुग्णालय आणि औषध पुरवठा करण्यासाठी इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सदर खर्च संबंधित अधिकाऱ्यांनी भरावा. सरकारी रुग्णालय व आयुष्यमान खात्याच्या मेडिसीनबाबत स्टॉक आणि स्विकृती तसेच पुरवठा याबाबत रजिस्टर नमूद करण्यात यावे, असे त्यांनी   सांगितले. आर्थिक वर्ष संपत आले असून जिल्हा पंचायतीला संबंधित असणारे लिंक डॉक्युमेंट योजनेतील निधी वाया जावू नये याकडे लक्ष द्यावे. खर्च न करता असलेला निधी सरेंडर म्हणून सरकारकडे पाठवावा. याबाबत समस्या असल्यास थेट जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे सांगितले. यावेळी जि. पं. उपकार्यदर्शी बसवराज आडवीमठ, योजना अधिकारी गंगाधर दिवटर, मुख्य लेखा परीक्षक परशराम दुडगुंटी, कृषी खात्याचे संचालक शिवनगौडा पाटील, आनंद बनगार, बसवराज कट्टी, पशुसंगोपनचे उपसंचालक राजीव कुलेर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी, जिल्हा आयुष्यमान अधिकारी श्रीकांत सुनधोळी आदी अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.