महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

थकीत भाडे तात्काळ भरा,अन्यथा गाळे सील

04:22 PM Jan 14, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

महापालिका मालकीच्या गाळेधारकांनी थकीत गाळे भाड्यासह चालू वर्षातील भाडेही तात्काळ भरावे अन्यथा गाळेधारकांचे गाळे सील करण्यात येतील असा इशारा महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच भाडे न भरणाऱ्या गाळे धारकांच्या मालमत्तेवरही बोजा नोंद करण्यात येणार असल्याच्या नोटीस गाळे धारकांना लागू करण्यात आल्या आहेत.

Advertisement

महापालिका मालकीच्या मार्केट मधील सर्व थकबाकीदार गाळेधारकांना सन 2015 पासूनचे प्रलंबित भाडे भरणेबाबत नोटीसव्दारे कळविण्यात आले होते. त्यानुसार काही गाळेधारकांनी सन 2015 पासूनचे प्रलंबित भाडे भरले आहे. परंतु काही गाळेधारकांनी थकीत भाडे अद्यापही भरलेले नाही. तरी शहरातील सर्व थकबाकीदार गाळेधारकांनी करार संपुष्टात आलेले व मुदतीत असलेले गाळेधारक, भाडेकरू यांनी आपले दुकानगाळेची थकबाकी व सन 2024-25 चालू आर्थिक वर्षाची भाडेची रक्कम तात्काळ भरावी अशा सुचना इस्टेट विभागाच्या वतीने नोटीसीद्वारे देण्यात आल्यात आहेत. तसेच जे गाळेधारक थकबाकीची रक्कम भरणा करणार नाहीत अशा सर्व गाळेधारकांचे गाळे सील करण्यात येणार आहेत. सोबतच त्यांच्या खाजगी मिळकतीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार थकबाकीचा बोजा नोंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तरी थकबाकीदार गाळे धारकांनी आपली थकीत रक्कम लवकरात लवकर भरावी असे आवाहन महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article