Kolhapur News : कोल्हापुरात सुसाईड नोट व्हॉट्सअॅप करुन डॉक्टरची आत्महत्या
जयसिंगपूर येथील डॉक्टरची कोल्हापुरात आत्महत्या,
कोल्हापूर : कुटुंबीय आणि मित्रांना सुसाईड नोट व्हॉ टसअॅप करुन डॉक्टर तरुणाने राजाराम तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. अवधूत प्रकाश मुळे (बय ३९ रा. जयसिंगपूर) असे त्यांचे नाव आहे.
शनिवारी सकाळी हा प्रकार उघड झाला. मृत डॉ. अवधूत मुळे यांनी वैद्यकीयसॅकमध्ये विटा, दगड भरून राजाराम तलावात घेतली उडी शिक्षण घेतले आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून त्यांनी प्रॅक्टीस बंद केली होती. पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर ते निराश झाले होते. त्यामुळे घरातून बाहेर राहात होते. शुक्रवारी ते कोल्हापुरात आले होते.
याबाबत त्यांनी कुटुंबीयांना फोन करून माहिती दिली. सायंकाळी राजाराम तलाव परिसरात त्यांनी सुसाईड नोट लिहून ती मित्र आणि कुटुंबीयांना व्हॉटसअॅप करुन पाठवली. त्यानंतर राजाराम तलावाच्या परिसरात दुचाकी, कपडे आणि इतर साहित्य दुचाकीला अडकवून त्यांनी पाठीवरील सॅकमध्ये दगड आणि विटा घालून तलावात उडी मारली.
नातेवाईक त्यांचा शोध घेत कोल्हापुरात आले. राजाराम तलाव परिसरात त्यांची दुचाकी सापडली. नातेवाईकांनी याबाबत राजारामपुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने तलावातून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणला. तेथे उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राजारामपुरी पोलिसात याची नोंद झाली आहे.