Satara : साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा
नागेवाडीची जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर
सातारा : सातारा जिल्ह्यातील युवकांना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळावी, यासाठी सातारा जिल्ह्यात आयटी पार्क व्हावे, यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून नागेवाडी ता. सातारा येथील ४२ हेक्टर ८७ आर इतकी जागा आयटी पार्कसाठी औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली असून सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.
सातारा जिल्ह्यातील आयटी क्षेत्राशी निगडीत इंजिनियर्स आणि युक्क व युवतींना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, येथील युवकांना पुणे, मुंबई यासह अन्य शहरात नोकरीसाठी जावे लागू नये, यासाठी सातारा तालुक्यातील नागेवाडी (लिंब खिंड) येथील शासकीय जागेत आयटी पार्क उभारण्यात यावा, यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभ्यासपूर्ण पाठपुरावा सुरु केला होता. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार काठी दिवसांपूर्वीच सदर जागेची पाहणी एमआयडीसी विभागामार्फत करण्यात आली होती. मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार त्याचा परिपूर्ण अहवाल आणि प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता.
सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे होती. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत नागेवाडी (ता. संग्रहित सातारा) येथील गट नं. ३०८/१ येथील ४२ हेक्टर ८७ आर एवढे क्षेत्र आयटी पार्क यासाठी आरक्षित करण्याचे नोटिफिकेशन जारी करून डी जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच पुढील कार्यवाही गतीने केली जाणार आहे. पुढील कार्यवाही गतीने होण्यासाठी आवश्यक सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्या आहेत.