कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंदवाडी परिसरातील पेव्हरब्लॉक उखडले

11:15 AM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाहतुकीस अडथळा : संबंधित विभागाने लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी 

Advertisement

बेळगाव : शहर व उपनगरांत रस्त्यांची समस्या वाढत चालली आहे. एकीकडे खड्डे तर दुसरीकडे विविध ठिकाणी पेव्हरब्लॉक उचकटल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हिंदवाडी येथे पेव्हरब्लॉक उखडल्याने वाहने चालविताना समस्या निर्माण होत असून परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे. चारचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगणे आवश्यक असून दुचाकी वाहन गांभीर्याने चालविणे गरजेचे आहे. दुचाकी स्लीप होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन दुरुस्तीची मागणी रहिवासी व प्रवाशांतून होत आहे.

Advertisement

हिंदवाडी परिसरात शाळा व महाविद्यालये कार्यरत आहेत. यामुळे सदर परिसर शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. यामुळे या मार्गावर विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गर्दी असते. दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत हा परिसर वर्दळीचा असतो. तसेच या मार्गावर शेकडो वाहनांचीही ये-जा कायम सुरू असते. मुलांना सोडणे व घेऊन येणे, नागरिक व रहिवासी आपल्या विविध कामासाठी या मार्गावरून प्रवास करत असतात. यासाठी हिंदवाडी परिसर सर्वांसाठी वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे.

यंदा शहरासह उपनगरांत अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला आहे. पावसामुळे विविध ठिकणाच्या रस्त्यांवर खड्डे पडले असून अनेक ठिकाणी पेव्हरब्लॉक उखडले आहेत. हिंदवाडी परिसरातील रस्त्यावरील पेव्हरब्लॉक पावसामुळे उचकटले असून यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे. शालेयसह महाविद्यालयीन विद्यार्थीही या रस्त्यावरून ये-जा करत असतात. त्यांच्यासाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. यामुळे अपघाताचा धोका उद्भवू शकतो. यासाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article