‘पॅटसन टोयाटो’ नवीन श्रेणी बेळगावकरांच्या सेवेत
टोयाटो कंपनीची सर्व वाहने-वर्कशॉप उपलब्ध करून देणार
बेळगाव : ‘पॅटसन टोयाटो’ने आपली नवीन सेवा बेळगावमध्ये सुरू केली आहे. टोयाटो कंपनीची सर्व वाहने या शोरूममध्ये उपलब्ध असणार आहे. या शोरूमचे उद्घाटन बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. थ्री एस अॅडव्हान्स फॅसिलिटी (सेल्स, सर्व्हिस व स्पेअरपार्ट) विभागाचे उद्घाटन आमदार अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या अत्याधुनिक वर्कशॉपमध्ये सुसज्ज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. टोयाटो कंपनीचे प्रशिक्षित कर्मचारी बेळगावमधील ग्राहकांना वर्ल्डक्लास सेवा देणार आहेत. या कार्यक्रमाला पॅटसन टोयाटोचे संचालक हर्ष पाटील व राहुल पाटील यांच्यासह पॅटसन परिवारातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी राहुल पाटील म्हणाले, ग्राहकांनी पॅटसन उद्योग समुहाला आजवर दिलेल्या विश्वासामुळेच इथपर्यंत यश गाठता आले. आता नव्या उमेदीने पॅटसन टोयाटो ही नवीन श्रेणी बेळगावकरांच्या सेवेमध्ये येत आहे. प्रत्येक ग्राहकाला टोयाटोची उत्तम सुविधा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले.