महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोलीस दलाचे अनगोळ भागात पथसंचलन

10:57 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथ पेठपर्यंत पथसंचलन : विशेष दलाच्या तुकडीचाही सहभाग 

Advertisement

बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात पोलिसांचे पथसंचलन सुरू आहे. गुरुवारी अनगोळ परिसरात पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या पथसंचलनात विशेष पथकातील जवानही सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्यासह शहरातील एसीपी, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस हवालदारांबरोबरच बंदोबस्तासाठी बाहेरून आलेले जवानही पथसंचलनात सहभागी झाले होते. सायंकाळी 6 वा. अनगोळ मराठी शाळेपासून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली. धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, मुस्लीम गल्ली, नाथ पै नगर, लोहार गल्ली, भेंडीगेरी गल्ली, मारुती गल्ली, रघुनाथ पेठ मार्गे पुन्हा धर्मवीर संभाजी चौक परिसरात पथसंचलनाची सांगता झाली. अग्रभागी काळे गणवेश परिधान केलेले विशेष प्रशिक्षित सशस्त्र जवान सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article