पाटणा पायरेट्स अंतिम फेरीत
वृत्तसंस्था / पुणे
2024 च्या प्रो कबड्डीr लीग स्पर्धेत पाटणा पायरेट्सने दबंग दिल्लीचा उपांत्य फेरीत पराभव करीत अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या या सामन्यात पाटणा पायरेट्सने दबंग दिल्लीचा 32-28 अशा चार गुणांच्या फरकाने पराभव केला.
पाटणा पायरेट्स आणि दबंग दिल्ली यांच्यातील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. पाटणा पायरेट्स संघातील देवांग तसेच अयान यांना शुभम शिंदेची चांगली साथ लाभली. शुभम शिंदेने 5 गुण तर अंकितने 4 गुण नोंदविले. पहिल्या 10 मिनिटामध्ये पाटणा पायरेट्सने दबंग दिल्लीवर 8-3 अशी 5 गुणांची आघाडी घेतली होती. सामन्याच्या मध्यंतरावेळी पाटणा पायरेट्सने दबंग दिल्लीवर 17-10 अशी बढत मिळविली होती. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये पाटणा पायरेट्सच्या आघाण फळीतील खेळाडूंनी आपल्या चढायांवर महत्त्वाचे 4 गुण मिळविल्याने दबंग दिल्लीला हा सामना थोडक्यात गमवावा लागला. आता या स्पर्धेत पाटणा पायरेट्स आणि हरियाणा स्टिलर्स यांच्यात जेतेपदासाठीची लढत रविवारी येथे खेळविली जाणार आहे.