पाकिस्तानात तयार होते ‘पत्थर की रोटी’
अत्यंत चवीने खातात लोक
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एक अशी रोटी तयार केली जाते, ज्याचे नाव ऐकून लोक चकित होतात. प्रत्यक्षात याचे नाव ‘पत्थर की रोटी’ आहे. ही रोटी दगडावर तयार केली जाते आणि याची चव अत्यंत अनोखी असते. ही एक खास प्रकारची रोटी असून ती पाकिस्तानच्या विविध क्षेत्रांमध्ये तयार केली जाते. याच्या निर्मितीची प्रक्रिया देखील अत्यंत रंजक आहे. या रोटीकरता एका ठोस दगडाच्या पृष्ठभागाचा वापर केला जातो.
गव्हाचे पीठ, पाणी आणि काहीसे मीठ वापरून ही रोटी तयार केली जाते. या आट्याला छोट्या छोट्या गोळ्यांमध्ये लाटून मग त्यांना तप्त दगडावर ठेवून रोटी तयार केली जाते. दगडाच्या वापरामुळे या रोटीची चव अत्यंत क्रिस्पी होते. ही रोटी सर्वसाधारणपणे मोठी असते आणि यात एक वेगळाच स्वाद असतो. खाण्यास ही रोटी कुरकुरीत असते आणि याला अनेक प्रकारच्या चटण्या किंवा भाज्यांसोबत वाढले जाते.
बलुचिस्तानात बहुतांश लोक हे भटक्या समुदायाचे आहेत. अशा स्थितीत त्यांच्याकडे स्वयंपाकघराची सुविधा नसते. याचमुळे ते दगडावर रोटी तयार करून ती खात असतात. अशाप्रकारच्या रोटीत भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनासाठी अत्यंत लाभदायक असते. पत्थर की रोटीचा स्वाद अत्यंत अनोखा असतो, याला दही, चटणी किंवा भाजीसोबत खाल्ले जाते.
पत्थर की रोटीचा इतिहास
पत्थर की रोटी निर्माण करण्याची परंपरा कित्येक शतके जुनी आहे. बलुचिस्तानात लोक शतकांपासून ही रोटी तयार करून खात असल्याचे मानले जाते. ही रोटी त्यांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य हिस्सा ठरली आहे. सोशल मीडियावर अशाप्रकारच्या रोटीचे व्हिडिओ दाखविले जात असतात.
पत्थर की रोटीचे फायदे
पत्थर की रोटीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनासाठी अत्यंत लाभदायक असते. तसेच यात तेल किंवा तूपाचा वापर केला जात नाही, याचमुळे ती एक आरोग्यदायी पर्याय आहे. याचबरोबर याच्या निर्मितीकरता कुठल्याही विशेष उपकरणाची आवश्यकता भासत नाही, याचमुळे ती पर्यावरणाच्या अनुकूल आहे.