For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रणकुंडये ते जांबोटीपर्यंतच्या रस्त्याचे पॅचवर्क पूर्ण

10:26 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
रणकुंडये ते जांबोटीपर्यंतच्या रस्त्याचे पॅचवर्क पूर्ण
Advertisement

प्रवासी-वाहनधारकांमधून समाधान : लवकरच डांबरीकरणाला होणार सुरुवात

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चोर्ला रस्ता कामाला फेब्रुवारीअखेर बेटणे ते कणकुंबीदरम्यान जेसीबीच्या साहाय्याने दुतर्फा असलेली झुडपे साफ करून ख•s भरण्याचे काम हाती घेण्यात आले होते. आता रणकुंडये ते जांबोटीपर्यंतच्या रस्त्यावरील पॅचवर्क पूर्ण करण्यात आल्याने थोड्याफार प्रमाणात प्रवासी व वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवार दि. 24 फेब्रुवारी रोजी कणकुंबी येथे रस्त्याचे भूमिपूजन करून कामाला चालना दिली होती. हुबळी येथील एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने दोन दिवसांत रस्ता कामाला सुरुवातही केली होती. परंतु कणकुंबी वनखात्यांकडून कामात आडकाठी आणली होती. त्यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी त्वरित जिल्हा वनाधिकाऱ्यांना बोलावून चर्चा करून वनखात्याचा गैरसमज दूर केला. त्यानंतर कणकुंबी ते चोर्ला हद्द रस्त्यांपैकी असलेल्या ख•dयांचे जेसीबीच्या साहाय्याने सपाटीकरण केले जात आहे. बेळगाव-चोर्ला-पणजी या रस्त्यांपैकी रणकुंडये ते चोर्ला म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या 43.5 कि. मी. रस्ताकामाला मंजुरी दिली आहे. बेळगाव, चोर्ला, पणजी हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 748 ए. ए. बेळगाव विभागांतर्गत येत असून सदर रस्त्याचे कंत्राट हुबळी येथील एम. बी. कल्लूर इन्फ्रॉस्ट्रक्चर कंपनीने घेतले आहे. त्यानुसार रणकुंडयेपासून रस्त्याच्या पॅचवर्कचे काम हाती घेण्यात आले होते. जांबोटीपर्यंतच्या रस्त्यावरील ख•s भरून पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या बेळगाव ते जांबोटीपर्यंतचा रस्ता वाहतुकीस थोड्याफार प्रमाणात चांगला बनल्याने प्रवासी व वाहनधारकांतून समाधान पसरले आहे.

Advertisement

चिखले ते चोर्ला रस्त्याचे पॅचवर्क त्वरित करण्याची मागणी

चिखले क्रॉस ते चोर्ला म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्यावरील ख•s बुजविण्याचे काम पहिल्यांदा हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून वेळोवेळी करण्यात येत होती. या रस्त्याची अवस्था अद्यापही भयानक असून चिखले ते कणकुंबी दरम्यान ठिकठिकाणी पडलेले ख•s अद्यापही वाहनधारकांना व प्रवाशांना धोकादायकच आहेत. त्यामुळे कंत्राटदाराने चिखलेपासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे. पहिल्या टप्प्यात रणकुंडये ते चोर्लापर्यंतच्या रस्त्यावरील पॅचवर्कचे काम पूर्ण झाल्यानंतर डांबरीकरणाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे. चोर्ला रस्ता दुरुस्तीसंदर्भात कणकुंबी भागातून अनेकवेळा निवेदन देऊन व आंदोलन करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर बेळगाव ते चोर्ला गोवा हद्द रस्त्यांपैकी 26.130 कि. मी. ते 69.480 कि. मी. म्हणजे रणकुंडये ते चोर्ला असे 43.5 कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

कामाचा वेग वाढविणे गरजेचे

हुबळीच्या एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने तीन महिन्यांत डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली आहे. रणकुंडये क्रॉसपासून ते गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्यावरील पॅचवर्क तसेच ज्या ज्या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे तो पूर्वस्थितीत करून त्यानंतर रणकुंडये ते गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. असे सांगण्यात आले आहे. तसेच पावसाळ्dयापूर्वी हा रस्ता वाहतुकीस मोकळा करून देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. परंतु सध्या असणाऱ्या कामाचा वेग पाहिला असता, पावसाळ्dयापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होईल की नाही याची खात्री नाही. मात्र ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान कुसमळीजवळील मलप्रभा नदीवरील ब्रिजचे काम हाती घेतले जाणार आहे.

Advertisement
Tags :

.