खोल समुद्रात लपलाय ‘पाताळलोक’
इतिहासात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत, ज्याविषयी आपल्याला काहीच कल्पना नसते. परंतु हा इतिहास कुठल्याही रुपात आपल्यासमोर आल्यावर त्याची व्यापकता जाणवू लागते. एक अशीच सृष्टी गल्फ ऑफ नेपल्समध्ये समोर आली आहे. तेथे समुद्रात कुणी कल्पनाही केली नसेल अशाप्रकारच्या गोष्टी मिळाल्या आहेत.
2 हजार वर्षे पूर्ण शहरच समुद्राखाली शोधण्यात आले आहे. समुद्राखाली सापडलेल्या गोष्टी एखाद्या आलिशान ठिकाणाशी संबंधित असल्याचे कळल्यावर पाणबुडे देखील थक्क झाले. प्रत्यक्षात हे एखाद्या पाताळलोकाप्रमाणे असून यात अनेक रहस्ये सामावलेली आहेत. समुद्राखाली 177 हेक्टरमध्ये एक बुडालेले शहर आहे. हे शहर सुमारे 2 हजार वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु याची स्थिती काळाच्या हिशेबानुसार अत्यंत चांगली दिसून येत आहे. येथे मोठमोठे पुतळे समुद्राच्या तळावर आहेत. समुद्राच्या 20 फूट खाली तळावर सुंदर मार्बलचे फ्लोर आहे. ज्याला व्हिलाचे रिसेप्शन मानले जात आहे. आर्कियोलॉजिकल पार्क ऑफ द प्लेग्राइन फिल्ड्सनुसार हे शहर तिसऱ्या शतकातील असल्याचे मानले जात आहे, ज्याचे नाव बाइया असल्याचे सांगण्यात येते.
अत्यंत आधुनिक शहर
येथे धनाढ्या लोक खासगी सहलीसाठी येत राहिले असावेत. हे एक फॅशनेबल सीसाइड रिसॉर्ट राहिले असावे, ज्याच्या आसपास केवळ रोमचे अत्यंत श्रीमंत लोक येत असावेत. ज्युलियस सीझर, क्लियोपेट्रा, सिसेरा आणि हेड्रियन यासारखे प्रसिदृध् लोक देखील या प्राचीन शहरात आले असावेत असे मानले जात आहे. जॉन स्माउट नावाच्या संशोधकाने क्लियोपेट्रा देखील या ठिकाणी आली असावी असा दावा केला आहे. कालौघात हे आलिशान शहर हायड्रोथर्मल आणि सेस्मिक हालचालींमुळे बुडाले.