पॅट कॅमिन्सचा 23 धांवात 6 बळी, अन् कसोटीत 300
वृत्तसंस्था/ लंडन
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सयाने विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात 6 बळी घेतले आणि कसोटी क्रिकेटमधील आपले 300 विकेट्स पूर्ण केले आहेत.
पॅट कमिन्स हा कसोटी सामन्यामधील 300 विकेट्स घेणारा आठवा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे. कगिसो रबाडाला बाद करत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली. कमिन्सने 18.1 षटकांत केवळ 28 धावा देत
6 विकेट्स घेतल्या. त्याच्या भेदक गोलंदाजमुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 138 धावांवर रोखले आणि पहिल्या डावातील 212 धावांच्या जोरावर 74 धावांची आघाडी मिळवली. सामना पॅट कमिन्सच्या कारकिर्दीतील 68वा कसोटी सामना आहे.आतापर्यंत 126 डावांत त्याने 300 विकेट्स घेतल्या असून,यामध्ये 14 वेळा 5 किंवा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याचे सर्वोत्तम कामगिरी 23 धावांत 6 विकेट्स आहे.ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचे स्थान आता असे आहे.
शेन वॉर्न 708 विकेट्स (स्पिनर)
ग्लेन मॅकग्रा 563 विकेट्स
नाथन लायन 553 विकेट्स (स्पिनर)
मिचेल स्टार्क 384 विकेट्स
डेनिस लिली 355 विकेट्स
मिचेल जॉन्सन 313 विकेट्स
पॅट कमिन्स 300 विकेट्स
32 वर्षीय कमिन्स अजून किमान तीन-चार वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो, त्यामुळे त्याच्याकडे 500 विकेट्स घेण्याची संधी देखील आहे.गोलंदाजीसह कमिन्स हा उपयुक्त फलंदाजही आहे. त्याने 68 टेस्टमध्ये 99 डावांत 3 अर्धशतकांसह 1461 धावा जमविल्या आहेत.