रस्त्याच्या एकाबाजूला पाद्री, दुसऱ्या बाजूला लोक
अनोखा चर्च, मजेशीर आहे याच्या निर्मितीची कहाणी
ऑस्ट्रियात एक अत्यंत लक्षवेधी चर्च आहे. येथील कॅरिथिया राज्यातील मंड शहरानजीक ही चर्च डिव्हायडेड चर्च या नावाने प्रसिद्ध आहे. यात एका बाजूला पाद्री उभे राहून प्रार्थना करतात तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या इमारतीत बसून लोक प्रार्थना करत असतात. या शहरासोबत या चर्चचाही स्वत:चा इतिहास आहे. अशाप्रकारची ही जगातील एकमेव चर्च आहे.
रस्ता जणू चर्चच्या मधून जात असल्याचे याकडे पाहिल्यावर वाटते. एका बाजूला चांसल असून तेथे पाद्री उभे राहण्यासाठी जागा आहे, तर रस्त्यासमोर दोन मजली गॅलरी आहे, तेथे येणारे जाणारे लोक थांबू शकतात आणि बसून पाद्रींचा उपदेश ऐकू शकतात. पूर्वी येथून जाणाऱ्या वाहनांमुळे अडथळे निर्माण होते, परंतु आता हा रस्ता खासगी मालकीचा ठरला आहे.
चर्चच्या एका बाजूला क्रेउजद एम बिचेल आहे. येथे प्रवासी थांबून प्रार्थना करत असतात. मार्टेले हे एकेकाळी महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता, याच्या मार्गात मंड एक लोकप्रिय ठिकाण होते.
मंड येथूनच धोकादायक पर्वतांच्या मार्गावरून प्रवास सुरू होतो. लोकांना येथून जाताना प्रवास यशस्वी ठरावा म्हणून आशीर्वाद घेता यावा याकरता या चर्चची निर्मिती करण्यात आली आहे. 1748 मध्ये याला पूजास्थळात रुपांतरित करण्यात आले होते अशी माहिती मंडचे शहरी असोसिएशनच्या बोर्डाचे सदस्य एंटोन फ्रिट्ज यांनी दिली आहे.
पूजास्थळ निर्माण झाल्यावर येथून जाणारे लोक थांबून प्रार्थना करू लागले. परंतु पावसादरम्यान लोकांना प्रार्थना करताना भिजावे लागत असल्याचे दिसून आल्यावर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दोन मजली गॅलरी तयार करण्यात आली. येथे दोन खोल्या असून यात बेंच आणि खुर्च्या आहेत.