For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पासपोर्ट सेवा कार्यक्रम 2.0 सुरू

06:11 AM Jun 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
पासपोर्ट सेवा कार्यक्रम 2 0 सुरू
Advertisement

जयशंकर यांच्याकडून ई-पासपोर्ट रोलआउटची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी 13 व्या पासपोर्ट सेवा दिनी भारत आणि विदेशातील पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच त्यांनी पासपोर्ट सेवा कार्यक्रमाच्या (पीएसपी) पुढील टप्प्याची आणि देशव्यापी ई-पासपोर्ट सेवांच्या सुरुवातीची घोषणा केली. पासपोर्ट सेवा कार्यक्रम 2.0 आणि ई-पासपोर्टच्या सुरुवातीसह विदेश मंत्रालय आमच्या पासपोर्ट सेवांची कालबद्धता, पारदर्शकता आणि पोहोच वाढविण्यासाठीच्या स्वत:च्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार करत असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

Advertisement

जयशंकर यांनी ‘सेवा, सुशान आणि गरीब कल्याण’च्या स्तंभांच्या अंतर्गत पासपोर्ट सेवांमध्ये झालेल्या बदलांवर जोर दिला. तसेच हे बदल विकसित भारताचे लक्ष्य प्राप्त करण्याचे साधन असल्याचे म्हटले आहे. मागील एक दशकात पासपोर्ट सुविधांमध्ये बदल घडून आला आहे. यात 2014 मधील 91 लाखापासून वाढत 2024 मध्ये 1.46 कोटी पासपोर्ट जारी करण्यात आले आहेत. पासपोर्ट सेवा कार्यक्रम वर्जन 2.0 पूर्वीच पूर्ण देशात सुरू करण्यात आला आहे. यात दक्षता आणि पारदर्शकतेत सुधारासाठी उच्चस्तरीय तंत्रज्ञानांचा वापर करण्यात येत असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

नागरिक-केंद्रीत सेवेच्या पुढील स्तरासाठी भारत सरकारच्या प्रतिबद्धतेच्या अनुरुप आम्ही पूर्ण देशात पीएसपी व्ही2.0 सुरू केला आहे. ग्लोबल पीएसपी व्ही2.0 चे प्रायोगिक तत्वावर परीक्षण सुरू आहे. सर्व भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये हे टप्प्याटप्प्यांमध्ये लागू करण्यात येणार असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

ई-पासपोर्ट मोठी कामगिरी

जयशंकर यांनी ई-पासपोर्ट पुढाकाराला मोठी कामगिरी ठरविले आहे. हा पासपोर्ट संपर्करहित चिप-आधारित डाटा रीडिंगसोबत प्रवास सुलभ करतो आणि इमिग्रेशन मंजुरीत वेग आणतो. तर एम-पासपोर्ट पोलीस अॅपमुळे 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोलीस पडताळणीचा कालावधी 5-7 दिवसांपर्यंत कमी झाल्याचा दावा विदेशमंत्र्यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.