महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘पॅसरोल किंग’ प्रदीप राठोड देशातील नवे अब्जाधीश

06:51 AM Nov 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

शेअर बाजारात ‘सेलो वर्ल्ड’च्या आयपीओच्या धमाकेदार एन्ट्रीने देशाला एक नवा अब्जाधीश मिळाला आहे. ‘पॅसरोल किंग’ म्हणून ओळखले जाणारे प्रदीप राठोड हे भारतातील अब्जाधीशांच्या यादीत सामील होणारे सर्वात नवीन उद्योगपती ठरले आहेत. शुक्रवारी कंपनीचा शेअर 788.40 ऊपयांवर बंद झाला. यासह, ‘सेलो वर्ल्ड’चे बाजारमूल्य 16,732.29 कोटी ऊपये झाले आहे.

Advertisement

प्रदीप राठोड आणि त्यांच्या कुटुंबीयांची ‘सेलो वर्ल्ड’मध्ये सुमारे 78 टक्के हिस्सेदारी आहे. कंपनीने 617 ते 648 ऊपयांच्या किमतीत आयपीओ लॉन्च केला होता. याला बाजारातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. कंपनीचे उत्पादन पोर्टफोलिओ बाजारात खूप लोकप्रिय आहे. सदर कंपनी घरगुती वस्तू, उपकरणे, पेन-स्टेशनरी आणि फर्निचर बनवते. ‘सेलो वर्ल्ड’ची ख्याती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात चेअरमन आणि एमडी प्रदीप घिसूलाल राठोड यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी भारतात प्लास्टिक उत्पादनांना नवी दिशा दिली. राठोड यांना प्लास्टिक आणि थर्मोवेअर उद्योगात 40 वर्षांचा अनुभव आहे. त्यांची दोन मुले गौरव आणि पंकज हे देखील कंपनीत संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article