कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विमानतळावर प्रवाशांची धावपळ अन् प्रशासनाची धरपकड

11:07 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव विमानतळावर बुधवारी अचानक धावपळ सुरू झाली. काही प्रवासी मिळेल त्या जागी आपला जीव वाचविण्यासाठी धावत होते. पोलीस यंत्रणा सज्ज होऊन नागरिकांना व कर्मचाऱ्यांना विमानतळातून बाहेर काढत होते. हे चित्र पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. देशात दहशतवादामुळे एक वेगळे वातावरण तयार झाले असताना अचानक असा प्रसंग निर्माण झाल्याने विमानतळ परिसरात प्रवाशांची घाबरगुंडी उडाली.

Advertisement

एअरपोर्ट अॅथॉरिटीच्या सूचनेनुसार बेळगावमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले. मॉक ड्रिलचा एक भाग म्हणून हे सर्व नाट्या करण्यात आल्याचे स्पष्ट होताच प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभर अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत बचाव कसा करावा, यासाठी ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येत आहे. बुधवारी बेळगाव विमानतळामध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले. पोलीस प्रशासन, तसेच विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.

Advertisement

दहशतवाद्यांकडून विमानतळ, रेल्वेस्थानक यासह महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ल्याची दाट शक्यता होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून विमानतळावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक प्रवाशाची कसून चौकशी करूनच  विमानतळात प्रवेश दिला जात आहे. संशयास्पद हालचाली दिसल्यास त्यांची त्वरित चौकशी करण्याचे आदेश विमानतळ प्रशासनाने दिले आहेत. बुधवारी विमानतळावर अग्निशमन विभाग, पोलीस व विमानतळ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मॉक ड्रिल झाले. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बचाव कसा करावा, यासंदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिली. विमानतळ प्राधिकरणाचे संचालक त्यागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल करण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article