Solapur News : कर्जत रेल्वे ट्रॅफिक ब्लॉकचा फटका प्रवाशांना !
रेल्वेने कर्जत रेल्वे स्थानकावर तब्बल ३० तासांचा मेगा ट्रॅफिक ब्लॉक केला जाहीर
सोलापूर : मध्य रेल्वेने कर्जत रेल्वे स्थानकावर १२ ऑक्टोबरला तब्बल ३० तासांचा मेगा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. यामुळे सोलापूर, मुंबई, पुणे, कोकण आणि दक्षिण भारताच्या दिशेने धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडणार आहे.
दरम्यान, ११ ते १२ ऑ क्टोबरदरम्यान होणाऱ्या या ब्लॉ कमुळे १२ ऑक्टोबर रोजी मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्प्रेस तसेच १२ ऑक्टोबर रोजी पनवेल-नांदेड एक्प्रेस, ११ ऑ क्टोबर रोजी निघणारी नांदेड-पनवेल या दोन्ही गाड्या रद्द करण्यात
आल्या आहेत. तर सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार आहे. त्यामुळे सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि सोलापुरात परतणाऱ्या प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागणार आहे.
दरम्यान, शनिवार, ११ रोजी दुपारी १२.२० ते रविवारी सकाळी ७.२० या पहिल्या टप्प्यात १९ तासांचा अंडर ट्रैफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यानंतर रविवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२० ते संध्याकाळी ६.२० या दुसऱ्या टप्यात ११ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक राहणार आहे. या काळात सिग्नलिंग, ट्रॅ क आणि तांत्रिक दुरुस्तीची मोठी कामे कर्जत स्थानकावर केली जाणार आहेत.
दिवाळीपूर्वीच अनेक विद्यार्थी, नोकरदार आणि कुटुंबीय प्रवासाचे आरक्षण करून बसलेले असल्याने या ब्लॉकचा मोठा फटका बसणार आहे. कर्जत स्थानकावरील कामे पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रीशेड्यूल आणि उशिराने पोहोचणाऱ्या गाड्या
१२ ऑक्टोबर रोजी मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस रविवारी दुपारी ४.०५ ला सुटणार, १२ ऑक्टोबर रोजी दौंड-इंदोर एक्प्रेस-दौंडहून दुपारी २.५५ ला सुटेल, १२ ऑ क्टोबर रोजी यशवंतपुर-बिकानेर एक्प्रेस-लोणावळा येथे २ तास ३५ मिनिटे उशिराने पोहचेल, कोईमतूर-एलटीटी एक्स्प्रेस-पुणे येथे २ तास उशिराने पोहचेल, म्हैसूर-एलटीटी एक्प्रेस पुण्यात ४० मिनिटे उशिराने पोहचेल.
कर्जत स्थानकावर थांबा रद्द केलेल्या गाड्या
दौंड-इंदोर एक्स्प्रेस (११ व १२ ऑक्टोबर रोजी निघणारी) भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्प्रेस (१० व ११ ऑक्टोबर रोजी निघणारी), बिदरमुंबई एक्स्प्रेस (99 व १२ ऑक्टोबर रोजी निघणारी), नांदेड-पनवेल एक्स्प्रेस (१२ ऑक्टोबर रोजी निघणारी).
रद्द किंवा पुण्यापर्यंत धावणाऱ्या प्रमुख गाड्या
१२ ऑक्टोबर रोजी वंदे भारत एक्प्रेस (मुंबई-सोलापूर-मुंबई) पूर्णपणे रद्द, १२ ऑक्टोबरला निघणारी पनवेल-नांदेड एक्प्रेस रद्द, ११ ऑक्टोबरला निघणारी नांदेड-पनवेल एक्प्रेस रद्द, ११ ऑक्टोबर रोजी निघणारी सिद्धेश्वर एक्प्रेस सोलापूर-मुंबई व होस्पेट-मुंबई एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावेल. ११ ऑक्टोबर रोजी निघणारी काकीनाडा पोर्ट-मुंबई आणि हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस लोणावळ्यापर्यंतच धावणार आहे.