कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बससेवा कोलमडल्याने प्रवासी-विद्यार्थ्यांचे हाल

12:04 PM Sep 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तालुक्यातील धोका पत्करुन विद्यार्थ्यांचा प्रवास : बससेवा वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच बेळगावसह इतर ठिकाणची बससेवा पूर्णपणे कोलमडल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना अपुऱ्या बससेवेमुळे धोका पत्करुन शिक्षणासाठी प्रवास करावा लागत आहे. मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने विद्यार्थी आणि पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. खानापूर शहरात हायटेक बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र हे बसस्थानक आणि आगार फक्त शोभेची वास्तू झाली आहे. बस आगारात एकही नवीन बस नाही. तसेच आगाराला आवश्यक असणाऱ्या बस उपलब्ध नसल्याने संपूर्ण ग्रामीण भागातील बससेवा कोलमडली आहे. एकाही गावात सुरळीत बससेवा नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी खानापूर आणि बेळगावला रोज येतात. बेळगाव आणि खानापूर येथील शाळा, महाविद्यालयही सकाळच्या सत्रात सुरू होतात.

Advertisement

यासाठी विद्यार्थी पहाटे सहापासूनच खानापूरला येण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र ग्रामीण भागातून खानापूरला येण्यासाठी सकाळी 6 ते 9.30 पर्यंत सुरळीत बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत उभे रहावे लागते. तसेच बसमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना अक्षरश: लोंबकळत धोका पत्करुन प्रवास करावा लागत आहे. खानापूर तालुक्याच्या शिरोली, गुंजी, लोंढा, नंदगड, जांबोटी तसेच देवलत्ती भागातून सकाळच्या वेळेत विद्यार्थी शाळा, महाविद्यालयासाठी खानापूरला येतात. मात्र सकाळच्या वेळेत बससेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. खानापूर येथूनही सकाळी 8 ते 10 या वेळेत बससेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांची बेळगावला जाण्यासाठी गर्दी असते. शिरोली भागातूनही वेळेवर बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. डोंगरगाव येथे आवश्यक नसताना वसति बससेवा सुरू केली आहे. ही बस पहाटे 6.30 वा. डोंगरगाव येथून निघत असल्याने या बसमधून एकही प्रवासी प्रवास करत नाही. हीच बस जर 8.30 वा.डोंगरगाव अथवा हेम्माडगातून सोडल्यास विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.

खानापूर आगारात बसची कमतरता 

खानापूर बसस्थानक हायटेक झाले असले तरी या हायटेक बस आगारात एकही बस नवीन नाही. दुसऱ्या आगारात वापरलेल्या बसेस खानापूर आगारासाठी देण्यात आलेल्या आहेत. खानापूर आगारात मोडकळीस आलेल्या बसेस देण्यात आलेल्या आहेत. वारंवार या बसेस रस्त्यावरच बंद पडत आहेत. वेळोवेळी दुरुस्ती करून बस वापरात येत आहेत. अनेक वर्षापासून खानापूर बस आगाराच्या व्यवस्थापनाविरोधात वेळोवेळी मोर्चे, आंदोलने तसेच अधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत. मात्र खानापूर बस आगाराचा कारभार काही सुधारलेला नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article