महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

यल्लम्मा यात्रेसाठी प्रवाशांचा प्रतिसाद

10:17 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शाकंभरी पौर्णिमेसाठी सौंदत्ती यल्लम्माला जाणाऱ्या भक्तांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बेळगाव-सौंदत्ती मार्गावर सोडलेल्या अतिरिक्त बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. गुरुवारी मध्यवर्ती बस स्थानकातून सौंदत्ती डोंगराकडे तब्बल 75 हून अधिक बसेस धावल्या. यंदा शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत बस प्रवास दिला जात असल्याने या विशेष बससेवेला महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. सौंदत्ती यात्रेसाठी परिवहनने 31 जानेवारीपर्यंत अतिरिक्त बससेवा सुरू केली आहे. यात्रा काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही बस सोडण्यात आली आहे. गुरुवारी पौर्णिमेदिवशी या बससेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे यंदादेखील परिवहनच्या महसुलात भर पडणार आहे. यल्लम्मा यात्रेतून परिवहनला 70 ते 80 लाखांचा अतिरिक्त महसूल प्राप्त होतो. त्यामुळे परिवहनला यल्लम्मा यात्रेतून अतिरिक्त महसूल प्राप्त होईल, अशी आशा आहे. काही भाविकांनी बसेस बुक केल्या आहेत. त्यामुळे एकूण 100 हून अधिक बसेस यल्लम्मा यात्रेसाठी धावू लागल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article