महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पार्वतीनगर रस्त्याची चाळण

11:07 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची स्थानिकांची मागणी

Advertisement

बेळगाव : जैतनमाळ रोड, पार्वतीनगर येथे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून चाळण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना कसरत करतच ये-जा करावी लागत आहे. जोरदार पावसाने रस्त्याची दुर्दशा झाल्याने स्थानिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गणेशचतुर्थी जवळ आल्याने अशा रस्त्यातूनच गणेशाचे आगमन होणार का? असा संतप्त सवालही स्थानिकांनी उपस्थित केला आहे. स्मार्टसिटीअंतर्गत एकीकडे काँक्रिटचे रस्ते झाले आहेत तर दुसरीकडे शहरातील अनेक रस्ते विकासाविना आहेत. त्यामुळे स्थानिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यांवरील खड्डे धोकादायक ठरू लागले आहेत. वयस्कर आणि बालचमूंना येथून ये-जा करणेही कठीण होऊ लागले आहे. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article