महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बिहारमधील निर्माणाधीन पूलाचा हिस्सा कोसळला

06:01 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एकाचा मृत्यू : अनेक जण जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ सुपौल

Advertisement

बिहारच्या सुपौल येथे कोसी नदीवर देशातील सर्वात मोठा पूल उभारण्यात येत आहे. या निर्माणाधीन पूलाचा एक हिस्सा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 8 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच ढिगाऱ्याखाली 20 हून अधिक लोक अडकून पडलेले असू शकतात अशी भीती स्थानिक लोकांनी व्यक्त केली आहे.

सुपौलच्या बकौर येथे मधुबनीच्या भेजा घाटदरम्यान देशातील सर्वात मोठ्या रस्तेपूलाची निर्मिती केली जात आहे. या पूलाची लांबी 10.2 किलोमीटर असणार आहे. केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून 1199 कोटी रुपयांच्या निधीतून या मोठ्या पूलाच निर्मिती करण्यात येत आहे. पूलाचा एक हिस्सा कोसळण्याची दुर्घटना घडल्यावर स्थानिक लोकांमध्ये आक्रोश आहे. प्रशासनाच्या पथकाने दुर्घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. परंतु अत्याधुनिक उपकरणे नसल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले.

संबंधित पूल ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले होते. परंतु आता हा कालावधी डिसेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आला आहे. आतापर्यंत पूलाचे 56 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article