पहाडी पोपटांची तस्कारी, वनविभागाची मोठी कारवाई
वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे
शहरांमध्ये अनेक प्राणी, पक्ष्यांची अगदी सहज तस्करी होत असल्याचे दिसून येते. यातच वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत पहाडी पोपट (अलेक्झान्ड्रीन पॅराकिट) तस्करी केली जात होती. दरम्यान तस्करी करण्यांवर सीम शुल्क विभाग आणि वन विभागाने पुणे रेल्वे स्टेशन परिसरात करवाई केली. पहाडी पोपटांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तस्करी होणाऱ्या दोघांना २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदोश दिला आहे. शेख सरफराज शेख खदीर आणि सचिन सुजित रोजोरिया अशी या दोन्ही तस्कारी करण्यांची नावे आहेत.
या दोघांकडील पोपट ताब्यात घेऊन त्यांना पुन्हा निसर्गात सोडण्यात आले आहे. पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात पहाडी पोपटांची खरेदी- विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार वन विभागाने सांगवी फाट्यावर सापळा रचला आणि या दोघांनाही ताब्यात घेतले.
ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक मंगल ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या नेतृत्त्वाखाली केली. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी वैभव बाबर, प्रमोद रासकर, वनरक्षक काळूराम कड, अनिल राठोड, मधुकर गोडगे, ओंकार गुंड, विनायक ताठे, रमेश शिंदे आदी सहाभागी होते.
या प्रकरणी दोन्ही आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे. त्यांचनी येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.