वेबसीरिजमध्ये परिणीति चोप्रा
जेनिफर विंगेट मुख्य भूमिकेत
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स काही रंजक नवे चित्रपट अन् वेबसीरिज घेऊन येत आहे. नेटफ्लिक्सने एका नव्या सीरिजची घोषणा केली आहे. यात परिणीति चोप्रा अन् जेनिफर विंगेट या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरिज रहस्यमय धाटणीची असणार आहे.
या सीरिजमध्ये परिणीति चोप्रा, सोनी राजदान, जेनिफर विंगेट, हरलीन सेठी, ताहिर राज भसीन, अनूप सोनी, सुमीत व्यास आणि चैतन्य चौधरी हे कलाकार दिसून येणार आहेत. याचे दिग्दर्शन रेंसिल डिसिल्वा करणार आहेत. जेनिफर यापूर्वी सोनी लिवचा शो ‘रायसिंघानी वर्सेस रायसिंघानी’मध्ये दिसून आली होती. अभिनेत्रीची नेटफ्लिक्ससोबतची ही पहिलीच सीरिज असणार आहे. या सीरिजची निर्मिती सिद्धार्थ पी मल्होत्रा आणि सपना मल्होत्रा यांच्याकडून करण्यात येणार आहे. सपना यांनी यापूर्वी हिचकी, महाराज यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे.