जालंधरचे परगट सिंग संधू दुसऱ्यांदा अमेरिकेत महापौर
06:45 AM Dec 18, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
कॅलिफोर्निया राज्यातील गाल्ट शहरात लौकिक
Advertisement
वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
Advertisement
पंजाबमधील जालंधरच्या बेसरपूर गावचे परगट सिंग संधू हे सलग दुसऱ्यांदा अमेरिकेतील पॅलिफोर्निया राज्यातील गाल्ट शहराचे महापौर बनले आहेत. या निवडीमुळे त्यांच्या गावात व परिसरात आनंदाची लाट उसळली आहे. यापूर्वी संधू यांची डिसेंबर 2019 मध्ये गाल्ट सिटीच्या महापौरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांदा ते या पदावर विराजमान झाले आहेत. मागील कार्यकाळात लोकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केल्यामुळेच संधू पुन्हा जिंकले. परगट सिंग यांनी जालंधरच्या लायलपूर खालसा कॉलेजमधून शिक्षण घेतले. याशिवाय स्थानिक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेल्यानंतर तेथील राजकारणात ते सक्रिय झाले होते.
Advertisement
Next Article