काळ्या यादीतील गुन्हेगारांची परेड
वेळीच सुधारण्याचा सल्ला; अन्यथा कडक कारवाईचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
गैरधंद्यात गुंतलेल्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिला आहे. गुरुवारी खडेबाजार एसीपी कार्यालयाच्या आवारात काळ्या यादीतील गुन्हेगारांची परेड झाली. त्यावेळी पोलीस आयुक्तांनी त्यांना इशारा देण्याबरोबरच सुधारण्याचा सल्ला दिला आहे.
खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी, कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला, टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी व उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. परेडमध्ये काळ्या यादीतील 108 हून अधिक गुन्हेगार उपस्थित होते.
पोलीस अधिकाऱ्यांनी परेडमध्ये सहभागी झालेल्या गुन्हेगारांना सुधारण्याचा सल्ला देतानाच वारंवार गैरधंद्यात गुंतणे, सार्वजनिक शांततेला धक्का पोहोचविण्याची कृती करणे आदी कारवायांमध्ये गुंतणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. चार पोलीस स्थानकांच्या कायेत्रातील गुन्हेगारांना या परेडसाठी बोलाविण्यात आले होते.
| तीन वर्षात 40 तडीपार पत्रकारांशी बोलताना पोलीस उपायुक्त रोहन जगदीश म्हणाले, बेळगावात 1057 हून अधिक गुन्हेगार काळ्या यादीत आहेत. पोलीस स्थानकनिहाय परेड घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे. आता एसीपी कायेत्रातील परेड घेतली जात आहे. खडेबाजारनंतर मार्केट उपविभागासाठीही लवकरच गुन्हेगारांची परेड होणार आहे. गेल्या तीन वषृ 40 जणांना तडीपार करण्यात आले आहे. खडेबाजार उपविभागातून आणखी तीन प्रस्ताव आले आहेत. गुन्हेगारीत सक्रिय असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. |