कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत अ च्या विजयात पंतचे अर्धशतक

06:01 AM Nov 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

. आफ्रिका अ चा तीन गड्यांनी पराभव, कोटियन सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

चार दिवसांच्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी कर्णधार रिषभ पंतच्या शानदार अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघावर तीन गड्यांनी शानदार विजय मिळविला. तनुष कोटीयनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. उभय संघामध्ये दोन सामन्यांची ही मालिका खेळविली जात असून यजमान भारत अ ने 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना येत्या गुरुवारपासून खेळविला जाईल.

या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका अ ने पहिल्या डावात 309 धावा जमविल्यानंतर भारत अ संघाचा पहिला डाव 234 धावांत आटोपल्याने दक्षिण आफ्रिका अ संघाने 75 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. पण दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिका अ संघाला केवळ 199 धावांपर्यंत मजल मारता आली. भारत अ संघाला निर्णायक विजयासाठी 275 धावांचे आव्हान मिळाले. भारत अ संघाने 4 बाद 119 या धावसंख्येवरुन शेवटच्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. कर्णधार पंत आणि आयुष बदोनी यांनी 12 षटकात 63 धावांची भागिदारी केली.  रिषभ पंतने 113 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांसह 90 धावा झळकाविल्या. पंतचे शतक 10 धावांनी हुकले. बदोनीने 47 चेंडूत 4 चौकारांसह 34, कोटीयनने 2 चौकारांसह 23 धावा केल्या. भारताची यावेळी स्थिती 7 बाद 215 अशी होती. मानव सुतार व कंबोज यांनी आठव्या गड्यासाठी अभेद्य 62 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सुतारने 3 चौकारांसह नाबाद 20 तर कंबोजने 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 37 धावा जमविल्या. भारत अ च्या दुसऱ्या डावात 22 अवांतर धावा मिळाल्या. 73.1 षटकात भारताने 7 बाद 277 धावा जमवित आपला विजय नोंदविला. खेळाच्या शेवटच्या दिवशी भारत अ ने पहिल्या सत्रात 101 धावा जमविताना 3 गडी गमाविले. उपाहारावेळी भारत अ ची स्थिती 7 बाद 216 होती. मानव सुतारने सुब्रायनच्या गोलंदाजीवर विजयी चौकार ठोकला.

संक्षिप्त धावफलक - द. आफ्रिका अ प. डाव 309, भारत अ प. डाव 234, द. आफ्रिका अ दु. डाव 199, भारत अ दु. डाव 73.1 षटकात 7 बाद 277 (पंत 90, पाटीदार 28, बदोनी 34, कोटीयन 23, सुतार नाबाद 20, कंबोज नाबाद 37, अवांतर 22, व्ह्युरेन 3-56, मोर्की 2-33, सिले व सिपाम्ला प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article