महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंत टॉप टेनमध्ये, रोहित, कोहलीची घसरण

06:50 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयसीसी कसोटी क्रमवारी : अफगाणचा गुरबाज आठव्या स्थानी

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

कसोटी पुनरागमनात नोंदवलेल्या शानदार शतकामुळे भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने आयसीसीच्या ताज्या कसोटी मानांकनात टॉप टेनमध्ये पुन्हा दाखल झाला असून तो आता सहाव्या स्थानावर आहे. मात्र कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांची घसरण झाली आहे.

बांगलादेशविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत पंतने शतक नोंदवले. त्याचे आता 731 रेटिंग गुण झाले असून सलामीवीर यशस्वी जैस्वाल 751 गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या कसोटीत त्याने अर्धशतक नोंदवले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉप टेनमधील स्थान राखले असले तरी त्याची पाच स्थानाने घसरण झाली आहे. त्याने 716 रेटिंग गुण झाले आहेत. कोहलीची देखील पाच स्थानांनी घसरण झाली असून तो टॉप टेनच्या बाहेर पडला आहे. त्याला 12 वे स्थान मिळाले आहे.

लंका-न्यूझीलंड यांच्यात गॅलेत झालेल्या कसोटीने गोलंदाजांच्या पहिल्या क्रमांकात बदल झाले आहेत. प्रभात जयसूर्याने सर्वोत्तम स्पिनरचा लौकीक आणखी

भक्कम केला असून त्याने पाच स्थानांची झेप घेत आठवे स्थान पटकावले आहे. त्याने या सामन्यात 9 बळी टिपले. 743 रेटिंग गुणांसह लंकेतर्फे तीनही फॉरमॅटमध्ये वरचे मानांकन मिळविणारा पहिला खेळाडू आहे. त्याने असिता फर्नांडोला मागे टाकले आहे. दोन स्थानांची घसरण झाल्यानंतर 700 गुणांसह फर्नांडो 13 व्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या मानांकनात कमिंदू मेडिसने तीन स्थानांची बढत मिळवित 16 तर पाच स्थानांची प्रगती करणारा धनंजय डिसिल्वा अष्टपैलूंच्या मानांकनात 18 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने 168 रेटिंग गुण आहेत.

वनडे क्रमवारीत अफगाणचा युवा स्टार रहमानुल्लाह गुरबाज व ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड यांनी फलंदाजीत टॉप टेनमध्ये स्थान मिळविले आहे. द.आफ्रिका व इंग्लंडविरुद्ध जलद शतके नोंदवल्याचा त्यांना फायदा झाला. गुरबाजने त्याने सातवे वनडे शतक नोंदवत दहा स्थानांची प्रगती केली. तो आता 692 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. टॉप टेनमध्ये पोहोचणारा अफगाणचा तो पहिला फलंदाज आहे. यापूर्वी अफगाणच्या इब्राहिम झद्रनने 12 वे स्थान मिळविले होते. गुरबाजने हेडला मागे सारले. हेडने 684 गुणांसह नववे स्थान मिळविताना सात स्थानांची झेप घेतली. इंग्लंडविरुद्ध त्याने नाबाद 154 धावांची खेळी केली.

वनडे गोलंदाजांत अफगाणचा लेगस्पिनर रशिद खानने तिसरे स्थान मिळविताना  आठ स्थानांची प्रगती केली. त्याचे 668 रेटिंग गुण झाले आहेत. यूएईमध्ये झालेल्या द.आफ्रिकेविरुद्धच्या दोन वनडे सामन्यात त्याने 7 बळी टिपले. त्यांच्या प्रदर्शनामुळे अफगाणने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदाच मालिका जिंकली. टॉप पाच संघाविरुद्ध मालिका जिंकण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article