महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पन्नू हत्या प्रयत्नाची चौकशी होणार

07:00 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताचा निर्णय, मात्र हात असल्याचा इन्कार

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

अमेरिकेत वास्तव्यास असणारा खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याची अम्।sरिकेत हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप अमेरिकेने केला आहे. या आरोपाची गंभीर दखल भारताने घेतली असून हा आमच्या सुरक्षेलाही धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतातील संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या, दहशतवादी  टोळ्या आणि इतर संशयित यांची चौकशी यासंदर्भात केली जात असल्याची माहिती भारताने दिली असून अमेरिकेचा आरोप गांभीर्याने घेतला आहे. अशा हत्यांमध्ये किंवा हत्यांच्या प्रयत्नांमध्ये भारताचा कोणताही सहभाग कधीच नव्हता आणि यापुढेही राहणार नाही. आमच्या धोरणात असे प्रकार बसत नाहीत. मात्र, अशा हत्यांचा प्रयत्न सरकारशी संबंधित नसलेल्या अन्य व्यक्ती किंवा संघटना यांच्याकडून केला जाऊ शकतो. खलिस्तानवादी दहशतवाद्यांमध्ये अनेक गटतट आहेत. ते एकमेकांचा द्वेष करतात. तसेच त्यांच्यात टोळीयुद्धेही घडतात. अशाप्रकारे ते एकमेकांच्या हत्या करतात. पन्नू याची हत्या करण्याचा प्रयत्न अशाच टोळीकडून झ्ा़ाला असावा, असा संशय भारताने व्यक्त केला आहे.

भारताशी उच्चस्तरीय संपर्क

पन्नू हत्या प्रयत्न प्रकरण अमेरिकेने गंभीरपणे घेतले असून भारताशी त्या संदर्भात उच्चस्तरीय संपर्क केला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनीही ही बाब गंभीरपणे घेतली असून अमेरिकेला चौकशीत पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर अमेरिकेने हा मुद्दा भारताकडे उपस्थित केला होता. या प्रकरणी अमेरिकेत एका संशयित आरोपीच्या विरोधात अभियोग सुरु करण्यात आला आहे. तथापि, ही गुप्त कारवाई आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article