महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंकज नार्वेकर माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला गोमंतकीय

06:01 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

Advertisement

माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा 41 वर्षीय पंकज नार्वेकर हा पहिला गोमंतकीय गिर्यारोहक बनला आहे. विश्वातील सर्वांत उंच शिखर असलेल्या या शिखरावर पंकजने 21 मे रोजी कब्जा केला व ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.

Advertisement

पंकज सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात साहाय्यक अभियंतापदी आहे. त्याची 13 वर्षीय मुलगी गुंजन नार्वेकर हीसुद्धा एक प्रतिभावंत गिर्यारोहक आहे. गेल्या वर्षी पंकज व तिच्या मुलीने नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कँप गाठण्याचा पराक्रम साधला होता तसेच या बेस कँपवर जाणारी सर्वांत युवा गोमंतकीय हा मान गुंजनला मिळाला होता. तिने 12 वर्षांची असताना तुंगनाथ, चंद्रशीला व केदारनाथ हे अतिशय अवघड टॅक पूर्ण केले होते.

पर्वरीतील पंकज नार्वेकरने एव्हरेस्ट शिखर 21 रोजी पहाटे 5.30 वाजता यशस्वीरित्या सर केले. गिर्यारोहणाची जबरदस्त आवड असलेल्या पंकज नार्वेकर याचे गिर्यारोहकांची क्रेज असलेले माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे पुष्कळ वर्षांचे एक स्वप्न होते. 2015 मध्ये त्याने माऊंट कामेट हे 7750 मीटर, माऊंट कून हे 7070 मीटर, माऊंट कांग यात्से-1 आणि दोन ही 6400 व 6250 मीटर ही शिखरे सर केली होती. या मागील अनुभवाच्या बळावर पंकज नार्वेकरने गिर्यारोहणातील प्रतिष्ठित मानले जाणारे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले.

विरोधी पक्षनेत्यांकडून अभिनंदन

एव्हरेस्टवर चढाई करणारे पहिले गोमंतकीय पंकज नार्वेकर यांचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी अभिनंदन केले आहे. पंकज नार्वेकर यांच्या पुढील सर्व साहसांसाठी  विरोधी पक्षनेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

गोवा सरकारने त्यांच्या साहसाची दखल घेणे गरजेचे आहे. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आवाहन करतो की, त्यांनी त्यांच्या महान कामगिरीची दखल घ्यावी आणि त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना सरकारकडून बक्षीस द्यावे अशी मागणीही विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article