For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंगापूरमधील स्नूकर स्पर्धेत पंकज अडवाणी विजेता

06:37 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिंगापूरमधील स्नूकर स्पर्धेत  पंकज अडवाणी विजेता
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताचा अव्वल स्नूकरपटू पंकज अडवाणीने साँघे सिंगापूर ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्याने सिंगापूरच्या जेडेन आँगचा 5-1 अशा फरकाने पराभव केला.

अंतिम फेरी गाठताना अडवाणीने माजी आयबीएसएफ वर्ल्ड स्नूकर चॅम्पियन थायलंडच्या डेशावत पूमजाएंगचा उपांत्यपूर्व फेरीत 4-3 असा रोमांचक लढतीत पराभव केला. पंकजने अंतिम लढतीत 5-1 असा एकतर्फी विजय मिळविल्याचे दिसत असले तरी पहिल्या दोन फ्रेम्समध्ये त्याला संघर्ष करावा लागला. 2-0 अशा आघाडीनंतर तिसऱ्या प्रेममध्ये पंकजने मोठे ब्रेक्स मिळविले तरी आँगने जोरदार झुंज देत ही फ्रेम जिंकून आव्हान जिवंत ठेवल. मात्र चौथ्या प्रेममध्ये पंकजने शेवटची ब्राऊन पीस घेत त्याने अचूक क्लीअरन्स ही फ्रेम जिंकली. शेवटच्या प्रेममध्ये अडवाणीने 74-6 असा विजय मिळवित जेतेपदही निश्चित केले. येत्या नोव्हेंबरमध्ये दोहा येथे वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप होणार असून पंकज अडवाणी तेथे जेतेपद राखण्यासाठी प्रयत्न करेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.