कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीसीआय बिलियर्ड्समध्ये पंकज अडवाणी विजेता

06:02 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारताचा अव्वल बिलियर्ड्स व स्नूकरपटू पंकज अडवाणीने संथ सुरुवातीवर मात करीत तिसऱ्यांदा सीसीआय बिलियर्ड्स क्लासिकचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्याने ध्रुव सितवालाचा 5-2 अशा फ्रेम्सनी पराभव केला.

Advertisement

अंतिम लढतीच्या पहिल्या तीन प्रेममध्ये पंकजची कामगिरी निराशाजनकच झाली. पण त्याचा प्रतिस्पर्धी ध्रुवने दिलेल्या संधींचा अचूक लाभ उठवला. 95 चा मोठा ब्रेक मिळविला असताना ध्रुवकडून चुका झाल्या आणि पंकजने चौथी फ्रेम जिंकत 2-2 अशी बरोबरी साधली. त्यानंतरच्या तीन प्रेम्स जिंकून त्याने जेतेपद पटकावले. जेतेपदाचे त्याला 2.5 लाख रुपये बक्षीसही मिळाले. ध्रुवला 1.5 लाख रुपये मिळाले. अडवाणीने सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा जिंकली असून याआधी त्याने 2023 व 2024 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.

निकाल : पंकज विवि ध्रुव सितवाला (5-2) : 10-150, 150-148, 81-150, 150-96, 150-136, 150-147, 150-137.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article