धास्ती! लव्ह जिहादची
प्रेम ही एक दैवी गोष्ट आहे. पवित्र प्रेमाला वय आणि अनुभवाची अट नाही. ते कधी कुठे कसे निर्माण होईल कोणीच सांगू शकत नाही. प्रेमाला भाषेची, प्रांताची, जातीचीही गरज नसते. या सर्वांसकट अथवा या सर्वांशिवायही प्रेम होऊ शकते. मात्र पवित्र प्रेमांत स्वार्थ, उद्देश, वासना यांनी शिरकांव केला की, प्रेम हे प्रेम राहत नाही. अशाच प्रकारे प्रेमाचा भडीमार करीत याचे सोंग वठवित समोरच्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांचे धर्मांतर करण्याची एक चळवळ देशात सुऊ झाली आहे. ही चळवळ म्हणजे लव्ह जिहाद अथवा रोमियो जिहाद या नावाने ओळखली जात असल्याने, धर्मांतराच्या या लव्ह जिहादमुळे सर्वच धास्तावले आहेत. त्याचाच घेतलेला एक संक्षिप्त आढावा.
नवी मुंबईतील उरण येथे यशश्री शिंदे या तरूणीची हत्या. तर मुंबईतील धारावीमध्ये अरविंद वैश्य या तरूणाची हत्या. या दोन्ही घटनांमुळे पुन्हा एकदा लव्ह जिहादचा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे. विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम अगदी जवळ आला आहे. त्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहादचा मुद्दा म्हणजे राज्यात दंगलसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असे सांगणाऱ्या भारत देशांमध्ये अनेक धर्म, जात आणि प्रांताचे नागरिक मोठ्या एकोप्याने राहतात. मात्र या एकोप्याला तडा देण्यासाठी एक भयानक परिस्थिती उद्भवली आहे. येथील हिंदू समाजाला टार्गेट करीत या समाजाभोवती एकोप्याचे मिलन न होण्यासाठी, तसेच कोणताही धर्म या धर्माजवळ न येण्यासाठी शतकानुशतके बळाचा, दडपशाहीचा वापर करण्यास सुऊवात झाली होती. ती आजतागायत सुऊ आहे. यापूर्वी राजसत्तेचा वापर करून केलेले धर्मांतर इस्लामी मोगल काळात अनुभवले आहे. जिझिया कर, मूर्तिभंजन, जोहार आणि हिंदू स्त्रियांनी भरलेला जनानखाना. पुढे ब्रिटीश काळांत देखील धाक-दडपशाहीच्या जोरावर धर्मांतरणे इतिहासात नोंदविल्याच्या घटना ताज्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील धर्मांतराच्या प्रकाराने काहुर माजले होते. गोव्यात सेंट झेविअरने केलेले मनुष्यतेला लाजवतील असे अत्याचार आणि केरळच्या किनाऱ्यावर झालेल्या नफशंस हत्या या ताज्याच आहेत.
तसेच पूर्वांचल राज्यातील (मिझोरम, अऊणाचल प्रदेश, नागाभूमी, त्रिपुरा) तिथल्या जनजातींवर आपली प्रार्थनापद्धत लादायची आणि तुम्हाला मुक्तिसाठी अन्य मार्ग नाही असे सांगायचे. हा धर्मांतराचा प्रश्न खूप मोठा आणि विविध पैलू असलेला आहे. तो अद्याप सुऊच आहे. या लव्ह जिहादने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात धुमाकुळ घातला आहे. प्रेमाचे आश्वासन देत, तिच्यासाठी काही करायला तयार असल्याचे दाखवित शेवटी तिचेच धर्मांतर घडवून आणायचे आणि तिला मुस्लिम बनवायचे. असा या लव्ह जिहादचा उद्देश आहे. त्याप्रकारे गुप्त फतवा निघाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्याने, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांसह संपूर्ण देशातील पोलिस सरसावले आहेत. तर दुसरीकडे या लव्ह जिहादला स्पर्धक म्हणून लव्ह त्रिशुळची देखील अशीच संकल्पना आहे. मात्र प्रथम सुऊवात झाली ती लव्ह जिहादची. नवतरूण-तऊणींचे ब्रेन वॉश कऊन, त्यांना धर्मातील जिहादच्या नावावर घातकी कृत्य करण्यास प्रवृत्त करण्याचे काम दहशतवादी संघटना करतात, हे सर्वज्ञात आहे. मात्र या लव्ह जिहादची संकल्पनाच वेगळी आहे. या ठिकाणी हिंसा नाही तर अहिंसा आहे. येथे व्रुरता नाही, तर प्रेम आहे. या ठिकाणी अविश्वास नाही तर विश्वास आहे. या बाबींवर मारा करीत, लव्ह जिहादचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन खुलेआम धर्मांतर सुऊ झाल्याने, तपास यंत्रणादेखील हादरल्या आहेत. एकवेळ खुलेआम होणाऱ्या हिंसेला आळा घालता येईल, मात्र अहिंसेच्या माध्यमातून होणाऱ्या हिंसेला आळा घालणे म्हणजे मोठे आव्हान आहे. धनाढ्या आणि सर्वसामान्य तरूणीवर लव्ह जिहादचे जाळे टाकून, त्यांना धर्मांतराकडे घेऊन जाण्यासाठी हे समाजकंटक प्रयत्नशिल आहेत.
नेमका लव्ह जिहाद आहे काय? याची सुऊवात झाली कशी? याचादेखील एक इतिहास आहे. केरळमधल्या महाविद्यालयीन तऊणींशी (केवळ मुस्लिमेतर) ओळख करून घ्यायची, मैत्री वाढवायची, त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, त्यांच्या धर्मावर टीका करत राहायची आणि इस्लामचे उदात्तीकरण करायचे, त्यांना त्यांच्या कुटुंबापासून फूस लावून तोडायचे आणि मग त्यांना धर्मगुरूकडे नेऊन धर्मांतरित करायचे. यावेळी स्वखुषीने त्यांच्याशी लग्न केल्याचे भासवायचे. एकदा शरीरसबंध झाले की सोडून द्यायचे. या कामाचे रीतसर पैसे, दुचाकी आणि अन्य भेटवस्तू घ्यायच्या आणि पुढील मुस्लिमेतर मुली शोधायला कॉलेज कॅम्पसवर चकरा मारायच्या. असा प्रकार केरळ राज्यात प्रथम सुऊ झाला. हळूहळू मुस्लिम जनसंख्या वाढवत न्यायची. केरळमधील याच चळवळीला ‘लव्ह जिहाद’ अथवा “रोमियो जिहाद” या नावाने ओळखले जाई. लव्ह जिहाद ही संकल्पना नेमकी काय आहे, हे पोलीस, गुप्तहेर खाते आणि याकामाशी परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते, संशोधक यांना माहित आहे. मात्र अद्याप समान्य नागरिकांपर्यंत याची माहिती पोहचली नाही. नेमके याचा फायदा उचलीत या समाजकंटकांनी आपले जाळे टाकण्यास सुऊवात केली आहे. केरळनंतर लव्ह जिहादचे लोण संपूर्ण देशात पसरले आहे. गेल्या दोन वर्षात या लव्ह जिहादने गुजरातमध्ये धुमाकुळ घालण्यास सुऊवात केली आहे. गुजरातमधील सरासरी पाहता, गरब्यानंतर अनेक तरूणींनी धर्मांतर केल्याच्या घटना समोर आल्याने, गुजरात सरकार देखील हादऊन गेले आहे. तर महाराष्ट्रात देखील या घटना काही कमी नाहीत.
यशश्री शिंदे हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. तिची हत्या करणाऱ्या दाऊदला भलेही कर्नाटकातून अटक केली असली तरी आज यशश्री जीवंत नाही. तर मुंबईतील अरविंद वैश्य याचा देखील जीव परत येणार नाही. नेमके याच्या मुळावर घाव घालणे आवश्यक आहे. देशात तसेच राज्यात अद्यापही सीमीच्या कारवाया थांबल्या नाहीत. बंदी असताना देखील त्यांचे स्लिपरसेल अॅक्टीव्ह आहेत. देशाला बॉम्बस्फोट, गोळीबार या दहशतीने तोडता येत नाही. तर लव्ह जिहाद हे शस्त्र वापऊन अराजकता माजविण्याचे षडयंत्र सुऊ आहे. यामुळे राजरोसपणे सुऊ असलेल्या या लव्ह जिहादला आळा घालणे अत्यंत जिकरीचे आहे. अन्यथा यातून दोन धर्मांत तेढ वाढत जाणार हे नक्की.
- अमोल राऊत