महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विजयनगर येथील स्वराज्य युवक मंडळाने साकारला पन्हाळागड

06:06 AM Nov 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव / प्रतिनिधी

Advertisement

विजयनगर, हिंडलगा येथील स्वराज युवक मंडळाने खास दिवाळीनिमित्त पन्हाळा गडाची प्रतिकृती साकारली आहे. हा किल्ला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे.

Advertisement

दिवाळी सणाच्या आधी दहा-बारा दिवस या मंडळातील कार्यकर्त्यांनी हा किल्ला बनवण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. माती, दगड, चुना व इतर लागणारे साहित्य एकत्र करून अगदी हुबेहूब पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती बनविली आहे.

दिवाळी सणाच्या कालावधीत मंडळाच्यावतीने विविध सामाजिक व मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा किल्ला बनवण्यासाठी व या विविध उपक्रमांसाठी सिद्धार्थ राजू चौगुले, प्रतिक उमेश बेटगेरी, अलोक राकेश बेटगेरी, तन्मय महादेव हुंदरे, ऋषभ यल्लापा जमखंडीकर, अभिनव यल्लापा जमखंडीकर आदींनी परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article