बिबट्याच्या हल्यात शेळी ठार; उत्रेसह पन्हाळा तालुक्यात भितीचे वातावरण
उत्रे / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथे बिबट्याच्या हल्यात शेळी ठार झाली. वांजुळे वडा व गावच्या शेजारी असलेल्या शेतात मेंढपाळ मारुती उर्फ गोटया शिसाळे यांचा मेंढरांचा तळ बसला होता.याठिकाणी रात्री बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून बिबट्याच्या पाऊलखुणा असलेल्यां आठळुन आल्या आहेत.
येथील गावाशेजारी बाळुमामा मंदिर पाठिमागे शिवाजी पाटील यांच्या शेतात मारुती शिसाळे यांची बकरी तळ होता. रात्री दहा चे दरम्यान मारुती घराकडुन जेवण करून आले असता कळपातील मेंढी ओरडत असल्याने बॅटरी लावून पाहत असताना बिबट्या दिसुन आला. दरम्यान आरडाओरडा केल्याने बिबट्या पसार झाला.गावाशेजारी घटना घडल्याने नागरिक आले. यात शेळी जागीच ठार झाली. वनविभागाच्या अधिकारी बाजीराव देसाई व पथकाने पाहणी व पंचनामा केला असुन आता पर्यंत काही कुत्री यांचाही बिबट्याने फडसा पाडला आहे.पाऊलखुणा बिबट्याच्या असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याच्या वावराने परिसरात घबराट पसरली आहे. या परिसरात अनेक वेळा बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांना काळजी घ्यावी असे अधिकारी यांनी सांगितले.