For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंडित नेहरूच्या सात खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

10:52 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंडित नेहरूच्या सात खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
Advertisement

बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर, या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत 7 सुवर्ण, 1 रौप्य  पदकासह घवघवीत यश संपादन केले आहे. सदर स्पर्धेत सुशील कुमार थोरवीने 45 किलो गटात, संजू हेगडे 55 किलो वजनी गटात, श्रीशाल करेनी 60 किलो गटात, हर्षद नाईक 65 किलो गटात, वेदांत मासेकर 71 किलो गटात, कैलाश 65 किलो गटात यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर गिरकोरोमन कुस्ती प्रकारात सुरेश लंगोटी 92 किलो गटात विजेतेपद पटकाविले. तर मुलींच्या गटात श्रावणी पाटील 43 किलो गटात रौप्य पदक पटकाविले. वरील सर्व विद्यार्थ्यांना विजयराव नंदिहळ्ळी, शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. हिरेमठ, क्रीडा शिक्षक निरंजन कर्लेकर व विनायक कंग्राळकर तसेच सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या स्पर्धकांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.