For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दसरा विजेत्या खेळाडूंचा गौरव

10:48 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
दसरा विजेत्या खेळाडूंचा गौरव
Advertisement

बेळगाव : युवजन क्रीडा खात्यातर्फे खानापूर तालुकास्तरीय अॅथलेटिक क्रीडा स्पर्धेत ज्योती क्लबच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे. खानापूर तालुका दसरा स्पोर्ट्स मध्ये भूषण गुरव यांनी 800मी., 1500मी.,5000 मी., धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवून वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. श्रेया कोल्हेकरीने 800 मी. प्रथम, 1500 मी. द्वितीय, सुशील कुमार पाटीलने 800 मी. व 5000 मी. तृतीय क्रमांक मिळविला. सांघिक 4×400 मी. रिले स्पर्धेत वैभवी गोरे, किंजल सावंत यांनी विजेतेपद मिळविले. या सर्व खेळाडूंना ज्योती अॅथलेटिक स्पोर्टस् क्लबचे ज्येष्ठ प्रशिक्षक एल. जी. कोलेकर यांचे मार्गदर्शन लागले तर क्लबचे सर्व पदाधिकारी पालक यांचे प्रोत्साहन लाभत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मऱ्याप्पा पाटील यांनी केले तर आभार अनिल गोरे यांनी मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.