Pandharpur Wari 2025: विठुमाऊलींचे कपडे शिवणारा नामदेव शिंपी समाज, 750 वर्षांपासून सेवेत
नामदेव शिंपी समाजाचे ३५० कुटुंबे असून यातील १०० कुटुंब आजही देवाचे कपडे शिवतात
By : चैतन्य उत्पात
पंढरपूर : शिंपीयाच्या कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी, दिवसा माझी शिबी (शिवणकाम) रात्री माझी शिबी आरानुक (आराम) नाही जीवा, सुई आणि सुतळी, कात्री, गज, दोरा, मांडियेला पसारा सदासुखी नामा म्हणे शिवी, विठोबाचे अंगी, म्हणूनिया जगी धन्य झालो.
या श्री संत नामदेव महाराज यांच्या अभंगातील ओव्या विश्वदेवता परमात्मा श्री विठ्ठलाप्रति असणारी निस्सिम भक्ति प्रतित करण्प्रया आहेत. आज जागतिक शिंपी दिन आहे, यानिमित्ताने प्रत्यक्ष सावळ्या विठुरायाचे शिंपी असणारे श्री संत नामदेव महाराज यांच्या घराण्यातील राजेन्द्र दत्तात्रय निकते यांनी विशेष माहिती दिली.
साडे सातशे वर्षांपूर्वी प्रत्यक्ष श्री संत नामदेव महाराज हे श्री विठ्ठलाचे कपडे शिवत होते, आजही मंहगार गेशे गाग आहे निकते यांच्या प्रमाणेच नामदेव शिंपी समाजाचे ३५० कुटुंबे असून यातील १०० कुटुंब आजही देवाचे कपडे शिवतात. चंद्रभागा नदीच्या काठावर नामदेव महाराज मठ आहे, याच ठिकाणी देवाचे शिंपी नामदेव महाराज राहत. त्यांनी सुई धाग्याने अवघ्या देशाला प्रेमाच्या बंधनात गुंफले आहे.
आषाढी तसेच कार्तिक बारी अगोदर हजारो भक्त साक्षात श्री विठ्ठलाचे अनेक नवस फेडण्यासाठी पंढरपूर येथील या समाजातील कारागिराकडून देवाचे कपडे शिवून घेतात, मुलगा होऊ दे, नोकरी मिळू दे, मुलाची लग्ने जमू देत असे अनेक नबस बोलले जातात.
राज्यात अनेक घराणी अशी आहेत जी लग्नाचा बस्ता बांधण्याआधी श्री विठ्ठलास कपडे शिवून अर्पण करतात. पंढरपूर येथे देवाचे कपडे शिवताना ही मंडळी शुचिर्भूतता पाळतात, अंघोळ करून देवाचा अंगरखा केला जातो, विशेष म्हणजे हे करताना कारागीर तहान, भूक हरपून मग्न होतात, बाराबंदी, अंगरखा कधी शिवून झाला हे पण कळत नाही, असे संकेत तिकते यांनी सांगितले.
हा व्यवसाय करणाऱ्या शिंपी समाजाला कधी नुकसान झाले नाही. या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे टेप लावून माप घेतले तर ते चुकते, मात्र धागा किंवा दोऱ्याने माप घेतल्यास ते चुकत नाही. पंढरीत निकते, बुरांडे, भावलेकर, धोकटे, केकडे, काकडे, कालेकर, जवंजाळ, राशीनकर, रेळेकर, पिसे, पोरे, कटारे, पतंगे, सरवदे अशी सुमारे शंभर घरे देवाचे कपडे शिवण्याचे काम करतात. या घराण्यांची सातबी पिढी कार्यरत आहे. हाती घेतलेले काम करताना, हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन काम केले जाते.
सुई जोडण्याचे काम करते..
निकते यांचे आजोबा सोपान निकते हे देवाचे कपडे शिवताना सुई डोक्याला लावायचे तर कात्री पायाखाली ठेवायचे याचे कारण विचारल्यास त्यांनी सांगितले सुई हे माणसे जोडण्याचे काम करते, तर कात्री कापड अलग करते, माणूस जोडायचे कार्य करते तिला डोक्यावरच ठेवायचे अशी धारणा त्याकाळी होती.