Pandharpur : पंढरपूर तालुका पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
भीमा नदी बंधाऱ्याकडे जुगार खेळणाऱ्यावर पोलिसांचा मोठा छापा
पंढरपूर : गुरसाळे (ता. पंढरपूर) गावातील भीमा नदी बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रोडच्या बाजुला आडोशाला झाडाखाली जुगार खेळणाऱ्यांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी छापा टाकून २ लाख ५४ हजार १७० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरसाळे येथे ५२ पानी पत्त्याचा मन्ना नावाचा जुगार खेळताना महेश सुरेश पवार, दीपक बाळू गाडे, दीपक परमेश्वर रणपिसे, पांडुरंग उर्फ कुंदन अशोक रणपिसे, बजरंग उर्फ भज्या सुरेश पवार, सुभाष रमेश पवार (सर्व रा. गुरसाळे, ता. पंढरपूर), लखन उर्फ लंडन दादासाहेब वाकये (रा. पुर्नवसन टाकळी, पो. गुरसाळे, ता. पंढरपूर) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून दोन मोटारसायकल, तीन मोबाईल व रोख रक्कम असा २ लाख ५४ हजार १७० रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. ही कामगिरी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे भारत भोसले, एस. एस. शेंडगे, सय्यद, घंटे, आबटे, कदम, काळे यांनी केली आहे.