Pandharpur News : पंढरपूर पोलिसांची देशी दारू कारवाई, सात लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर पोलिसांचे निवडणूक पार्श्वभूमीवर सक्रिय पथक
पंढरपूर : नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलिसांनी तीन रस्ता, पंढरपूर येथे नाकाबंदी करीत चारचाकीतून देशी दारूचे बॉक्स वाहणाऱ्या एकावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सात लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
तीन रस्ता चौक, पंढरपूर येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. दरम्यान, पंढरपूर तालुका पोलिसांनी इंडिका कार (एमएच १४-डीएन २००७) या गाडीला नाकाबंदी दरम्यान तपासण्यात आले. पंढरपूर कारवाईत पोलिसांनी जप्त गाडीमध्ये एकूण देशी दारू टैंगो पंच कंपनीचे दहा बॉक्स दारू मिळून आले. इंडिगो कार व टैंगो पंच दारू असा एकूण सात लाख ४० हजारांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला असून विजयकुमार कुलकर्णी (रा. रोपळे, ता. पंढरपूर) -याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस द है. क स अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पीएसआय विक्रम वहणे, भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, पोलीस हवालदार दीपक भोसले, सागर गवळी, विजयकुमार आवटी, चालक विलास घाडगे, हसन नदाफ, पोलीस हवालदार योगीराज खिलारे यांच्या पथकाने केली आहे.