Pandharpur News : मतमोजणी लांबल्याने पंढरपूर फुलबाजार कोलमडला; विक्रेत्यांत नाराजी
पंढरपूर नगरनिवडणूक निकाल पुढे ढकलल्याने माळी समाज निराश
पंढरपूर : पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचे निकाल तब्बल १९ दिवस पुढे गेल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.पंढरपूर येथील हार फूल विक्री करणाऱ्या माळी समाजाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
निवडणूक निकालानंतर मोठ्या प्रमाणात हार फुले खरेदी होते. यामुळे चढ्या दराने फूल हार विकणाऱ्या माळी समाजातील विक्रेत्यांनी खरेदी केली होती. बुधबार, ३ डिसेंबरला मतमोजणी होणार म्हणून निवडून येणारे उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना हारांची गरज असते. यासाठी दोन तारखेला फुलांचा लिलाव हा जास्त किमतीला झाला. फुल माळा विकणारे विक्रेते, गोपाळ कृष्ण मंदिराजवळील हार फुले विकणाऱ्या विक्रेत्यांची झाली. तीन तारखेला हार जास्त किमतीने विकून दोन पैसे मिळतील या उद्देशाने त्यांनी फुलं विकत घेतली परंतुमतमोजणी २१ डिसेंबरला होणार असल्याने त्यांनी खरेदी केलेली फुलं ही त्यांच्या व्यापारामध्ये अंगलट आल्याचे ते सांगत होते. ते पुढे म्हणाले की आता खरेदी केलेले फुल आम्हाला कमी किमतीने तोट्यात विकावी लागण्याची वेळ आमच्यावर आली असून आता आम्हाला दोन पैसे मिळणार नाहीतच
फुले ही नाशवंत वस्तू आहे, वेळेत वापर झाला नाही तर ती सुकून जातात, यावेळी निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार आणि त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात हार घेतील या अंदाजाने गुलाब, मोगरा, शेवंती, झेंडू, तुळस, जरबेरा, अस्टर अशा विविध फुलांची खरेदी मंगळवारीच केली होती. मात्र, नगरपालिका निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार असल्याने फूल विक्रेत्यांत निराशा पसरली आहे.