For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पनामा, उरुग्वेची आगेकूच, अमेरिका बाहेर

02:10 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
पनामा  उरुग्वेची आगेकूच  अमेरिका बाहेर
Advertisement

वृत्तसंस्था/ कान्सास सिटी

Advertisement

अमेरिकेचे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यांना उरुग्वेकडून 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला तर पनामाने बोलिव्हियावर 3-1 असा विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.

गट क मधील शेवटच्या सामन्यात अमेरिकेला पनामाशी बरोबरी किंवा उरुग्वेव्वर विजय मिळवित त्यांना मागे टाकण्याची गरज होती. पण शिस्तबद्ध खेळ करणाऱ्या उरुग्वेसमोर अमेरिकेला तसा खेळ करता आला नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या सामन्यात अमेरिकेला पनामाकडून 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. उरुग्वेविरुद्ध त्यांच्यासमोर कठीण आव्हान उभे होते. या सामन्यात त्यांना पुरेशा संधी निर्माण करण्यासाठीही झगडावे लागले. त्यामुळे उरुग्वेसमोर ते आव्हान उभे करू शकले नाहीत.

Advertisement

ओरलँडो येथील सामन्यात पनामाने बोलिव्हियावर पहिल्या 30 मिनिटांतच 1-0 अशी आघाडी घेतल्याचे समजल्यानंतर अमेरिकेच्या आशाही धूसर झाल्या. पण उत्तरार्धात बोलिव्हियाने गोल नोंदवून बरोबरी केल्याचे समजल्यानंतर त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. अशा स्थितीत अमेरिकेने उरुग्वेला बरोबरीत रोखले असते तरी त्यांना आगेकूच करता आले असते. पण त्यांची ही आशा फार वेळ टिकली नाही. 66 व्या मिनिटाला मथायस ऑलिव्हेराने गोल नोंदवून उरुग्वेला आघाडी मिळवून दिल्यानंतर अमेरिकेच्या आशेला धक्का बसला.  निकोलस डी ला व्रुझच्या फ्री किकवर अॅरॉजोने ताकदवान हेडर मारला, तो अमेरिकेचा गोलरक्षक मॅट टर्नरने हाताने परतावून लावला. संधी साधत या रिबाऊंड झालेल्या चेंडूवर ऑलिव्हेराने अचूक गोल केला. हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. या गोलसाठी रिव्ह्यू घेण्यात आला. पण रेफरीनी दीर्घ चर्चा करीत हा गोल वैध ठरविला.

पनामाला एदुआर्दो गुरेरोने गोल नोंदवून पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवून दिल्यावर अमेरिकेच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. पण स्टॉपेज टाईममध्ये सीजर यानिसने पनामाचा तिसरा गोल नोंदवत विजय आणि अमेरिकेचे स्पर्धेबाहेर पडणे निश्चित केले. अमेरिकेप्रमाणे मेक्सिकोचे आव्हानही प्राथमिक फेरीतच समाप्त झाले आहे.

Advertisement
Tags :

.