महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पणजीत तिसऱ्या टप्प्यातील पे पार्किंगचा लवकरच प्रारंभ

11:30 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तीन वर्षांसाठी कंत्राट बहाल : मनपाला मिळणार 1. 62 कोटी महसूल

Advertisement

पणजी : राजधानीत तिसऱ्या टप्प्यातील पे पार्किंग लवकरच प्रारंभ होणार असून त्याचे तीन वर्षांसाठीचे कंत्राट नुकतेच बहाल करण्यात आले आहे. त्याद्वारे मनपाला सुमारे 1.62 कोटी ऊपये महसूल मिळणार आहे या तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या परिसरामध्ये आझाद मैदानाजवळील टी. बी. कुन्हा मार्ग (जीसीसीआय), डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर मार्ग (मिश्रा पेढा), ऊआ इस्माईल ग्रासीयस मार्ग (नवहिंद भवन), कॉस्ता आल्वारीस मार्ग (पोशाख शोरूम), ऊआ गव्हर्नादोर पेस्टाना मार्ग (विद्युत भवन), डॉ. व्होल्फांग सिल्वा मार्ग (जुन्ता हाऊस), स्वामी विवेकानंद मार्ग (गोविंदा बिल्डिंग), डॉ. पुऊषोत्तम शिरगांवकर मार्ग (महालक्ष्मी मंदिर), कायतानो आल्बुकर्क मार्ग (डेल्मॉन हॉटेल), रॉड्रिगीश फ्रायतास मार्ग (नवतारा हॉटेल), डीबीमार्ग (मिलिटरी मुख्यालय), ऊआ कोंडे सार्जेडीस मार्ग (नवतारा) आणि कांपाल क्लिनिक ते अग्निशामक दल मार्ग (परेड मैदान), यांचा समावेश आहे.

Advertisement

रेन्ट अ बाईकवाल्यांची मक्तेदारी

दरम्यान, बसस्थानक परिसरात साईबाबा मंदिर व पावलू ट्रॅव्हल्सचे कार्यालय असलेल्या भागात रेन्ट अ बाईकवाल्यांनी संपूर्ण भागावर जसा काही कब्जाच केला असल्याचा विषय बुधवारी झालेल्या मनपा बैठकीत उपस्थित झाला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तेथे पार्किंगसाठी जागाच मिळत नसल्याचे एका नगरसेवकाने महापौरांच्या नजरेस आणून दिले व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. प्रत्यक्षात सदर जागा पे पार्किंगसाठी अधिसूचित करण्यात आली आहे. परंतु या भागात रेन्ट अ बाईकवाल्यांची मक्तेदारी आणि दादागिरी एवढी प्रचंड वाढली आहे की त्यांच्या शेकडो दुचाक्या या भागात दुतर्फा मांडलेल्या असतात. स्वत:ची खाजगी मालमत्ता असल्याच्या थाटात त्यांनी या परिसरावर कब्जा केला असून अन्य कोणत्याही व्यक्तीला तेथे पार्किंगसाठी जशी काही अघोषित बंदीच घालण्यात आली आहे. या प्रकरणी महापौर रोहित मोन्सेरात यांना विचारले असता, अशा प्रकारांना लवकरच आळा घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रकाराबद्दल अनेक तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचल्या असून लवकरच पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मोन्सेरात यांनी सांगितले.

‘स्मार्ट सिटी’बजबजपुरीस सल्लागार जबाबदार

त्वरित अटक करून चौकशी करावी : माजी महापौर उदय मडकईकर यांची मागणी

राजधानीत स्मार्ट सिटी अंतर्गत चाललेली विकासकामे नियोजनबद्दरित्या व्हावी यासाठी नियुक्त करण्यात आलेला सल्लागार सध्या गायब झाला असून तब्बल 8 कोटी ऊपये एवढी भरभक्कम फी घेऊनही आपल्या कर्तव्यात सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळेच एका निरपराध युवकास नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्राणास मुकावे लागले आहे. पोलिसांनी या सल्लागाराचा शोध घ्यावा व त्वरित अटक करून त्याची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नगरसेवक उदय मडकईकर यांनी केली आहे. बुधवारी आयोजित मनपाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राजधानीत सध्या विकासकामांची एवढी भरमार झालेली आहे की कोणता कंत्राटदार कुठले काम करतो तेच कुणाला कळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशाप्रकारे हजारो कोटींची कामे सुरू असताना कोणते काम कोणता कंत्राटदार करतो त्याबद्दल खरे म्हणजे जनतेला माहिती मिळायला हवी. परंतु तशी कोणताही  माहिती मिळत नाही. या अस्ताव्यस्थतेला सल्लागार तेवढाच जबाबदार असल्याने त्याच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी होणे गरजेचे आहे, असे मडकईकर म्हणाले. राजधानीत निर्माण झालेल्या या बजबजपुरीस मंत्री, आमदार, महापौर की अन्य कुणी जबाबदार आहेत? असे विचारले असता, मंत्री आमदारांपेक्षा स्मार्ट सिटीचे अधिकारीच या सर्व प्रकारास जबाबदार असल्याचे ते म्हणाले. दरमहा लाखो ऊपये पगार घेणारे आणि एसी कार्यालयात बसून काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या दुर्लक्षामुळेच लोकांचे हाल होत आहेत, असा दावा मडकईकर यांनी केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article