For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजी शिमगोत्सव मिरवणूक भाऊसाहेब बांदोडकर मार्गावऊन

12:11 PM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
पणजी शिमगोत्सव मिरवणूक भाऊसाहेब बांदोडकर मार्गावऊन
Advertisement

शिमगोत्सव समित्यांची आज पर्यटन खात्यात बैठक

Advertisement

पणजी : यंदाचा पणजीचा शिमगोत्सव दि. 30 मार्च रोजी होणार असून शहारातील बहुतांश रस्ते खोदलेले असल्याने मिरवणूक मांडवी पुलाजवळून सुरू कऊन ती कांपाल येथे विसर्जित होईल. दरम्यान, राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने सर्व शिमगोत्सव मिरवणुका रात्री 10 वा. पर्यंत बंद करणे भाग आहे. पर्यटन खात्याने पुरस्कृत केलेल्या राज्यातील सरकारी पातळीवरील शिमगोत्सव समित्यांची बैठक आज दुपारी पर्यटन खात्यात होणार आहे. राज्यातील सर्व शिमगोत्सव समित्यांचे अध्यक्ष आणि सचिव यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दुपारी 3 वा. होणाऱ्या या बैठकीमध्ये राज्य पातळीवर होणाऱ्या शिमगोत्सव मिरवणुकीचा अंतिम कार्यक्रम निश्चित होणार आहे. पर्यटन संचालक, पर्यटन सचिव तसेच पर्यटन खात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि शिमगोत्सव समित्यांचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहातील. दरम्यान, पणजीत राजधानी पातळीवर शिमगोत्सवास दि. 25 मार्च रोजी महालक्ष्मी मंदिरातून गुलालोत्सव मिरवणुकीने प्रारंभ होईल. ही मिरवणूक आझाद मैदानावर संपुष्टात येईल. त्यानंतर आझाद मैदानावर दररोज सांस्कृतिक कार्यक्रम होतील. पणजीत रोमटामेळ आणि चित्ररथ मिरवणूक तथा स्पर्धा दि. 30 मार्च रोजी सायं. 4 वा. मांडवी पुलाखालून सुरू होईल आणि भाऊसाहेब बांदोडकर मार्गावऊन कांपाल येथे विसर्जित होईल. शिमगोत्सव मिरवणूक बराच वेळ चालणार असल्याने दि. 30 रोजी दुपारनंतर बांदोडकर रस्त्याची एक बाजू पूर्णत: वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. पणजीच्या इतिहासात प्रथमच शिमगोत्सव मिरवणूक भाऊसाहेब बांदोडकर रस्त्यावऊन निघणार आहे.

वेळेचे बंधन एक आव्हान

Advertisement

राज्यातील सर्व शिमगोत्सव समित्यांना सरकारने वेळेचे बंधन पाळा, असा आदेश दिला आहे. निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झालेली आहे. सर्व सार्वजनिक सभा व सार्वजनिक कार्यक्रम रात्री 10 वा. बंद होणे आवश्यक आहे. काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनांतर्गत कारवाईची शक्यता असल्याने यंदा सर्व मिरवणुका दुपारी लवकर सुऊ कऊन रात्री 9.50 पर्यंत संपुष्टात आणाव्या लागतील. पणजीचा मुख्य रस्ताच त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत बंद केला जाणार असल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. वेळेचे बंधन पाळावे हे सर्वच आयोजक संस्थांसाठी फार मोठे आव्हान आहे. आयोजन समित्या हे आव्हान पेलत नसल्याने सर्व नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते.

Advertisement
Tags :

.