For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजी, मडगाव मतमोजणीस सज्ज

06:45 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
पणजी  मडगाव मतमोजणीस सज्ज
Advertisement

दोन्ही ठिकाणी कडेकोट सुरक्षा

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यात 7 मे रोजी दोन लोकसभा मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज मंगळवार 4 जून रोजी होणार असून सकाळच्या सत्रात एक-दोन तासातच निकालाचा कल दिसून येईल तर दुपारपर्यंत अंतिम निकाल जाहीर होतील. दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी 8 असे मिळून 16 उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून उत्तर गोवा मतदारसंघाची मोजणी सरकारी तंत्रनिकेतन आल्तिनो पणजी येथे तर दक्षिण गोवा मतदारसंघाची मोजणी दामोदर महाविद्यालय मडगाव येथे केली जाणार आहे.

Advertisement

सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार असून खरी लढत भाजप-काँग्रेस या दोन पक्षातच उमेदवारांमध्ये आहे. गोव्याचे दोन्ही खासदार कोण? याचे उत्तर आज मतमोजणीनंतर मिळणार आहे. प्रथम टप्प्यात टपाल मतमोजणी होणार आहे. त्यानंतर विधानसभा मतदारसंघानिहाय मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाला उमेदवाराला किती मते मिळाली हे समोर येणार आहे.

उत्तर गोवा मतदारसंघाची मोजणी 157 तर दक्षिण गोवा मतदारसंघाची मोजणी 161 टेबलांवर करण्यात येणार आहे. उत्तरेसाठी 706 तर दक्षिणेसाठी 651 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाचे 7 निरीक्षक उत्तर गोव्यासाठी तर 6 निरीक्षक दक्षिण गोव्यासाठी मतमोजणी केंद्रावर उपस्थित रहाणार आहेत.

कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती

मतमोजणीसाठी उत्तर गोव्यात 1793 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यात 236 निरीक्षक, 282 सुपरवायझर, 282 मोजणी सहाय्यक 376 निवडणूक अधिकारी, 163 सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि 454 पोलिंग एजंटांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यासाठी 1797 कर्मचारी नेमले असून ते मतमोजणी करतील त्यात 242 निरीक्षक, 220 सुपरवायझर, 200 मोजणी सहाय्यक, 210 निवडणूक अधिकारी, 430 सहाय्यक निवडणूक अधिकारी 496 एजंट यांचा अंतर्भाव आहे.

कडक पोलीस बंदोबस्त तैनात

मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था आखण्यात आली असून उत्तरेत 706 तर दक्षिणेत 651 पोलीस कर्मचारी नेमले आहेत. उत्तर गोव्यासाठी 475 जिल्हा पोलीस तर 206 वाहतूक पोलीस, 25 विशेष पोलीस तैनात आहेत. दक्षिण गोव्यासाठी 437 जिल्हा पोलीस, 189 वाहतूक पोलीस तर 25 विशेष पोलीस देण्यात आले आहेत.

तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था

मतमोजणी केंद्रावर तीन टप्प्यातील सुरक्षा व्यवस्था (थ्री टायर) नेमण्यात आली आहे. बाहेरील गेटवर राज्याचे पोलेस असतील तर आतमध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजे प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रांच्या बाहेर पोलिसांचे कडे असेल आणि मतमोजणीच्या ठिकाणी केंद्रीय पोलीस फोर्सचे सुरक्षा जवान तैनात असतील. मजमोजणी केंद्रांवर मोबाईल, कॅमेरा वापरण्यास बंदी आहे.

व्हीव्हीपॅट स्लीपांची मोजणी

या लोकसभा निवडणूक मतमोजणीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट स्लीपांची मोजणी होणार आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्रामुळे मतमोजणी लवकर होणार असली तरी व्हीव्हीपॅट स्लीपांच्या मोजणीमुळे निकाल जाहीर होण्यास उशीर होऊ शकतो. स्लीपांची मोजणी सक्तीची असून ती होईपर्यंत निकाल जाहीर करता येत नाही असे सांगण्यात आले.

दोन्ही ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था : अधीक्षक सुनिता सावंत

मतमोजणीच्या ठिकाणी पहाटे 4.30 वाजल्यापासून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सकाळी 6.30 सर्व सोपस्कर पूर्ण कऊन स्ट्राँग ऊम (मतपेट्या ठेवलेली खोली) उघडण्यात येईल. 7.30 पर्यंत कर्मचारी आपल्या जागांचा ताबा घेतील आणि ठिक 8 वाजता मतमोजणीला सुऊवात होणार असल्याची माहिती दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली आहे. उत्तर गोव्यातील मतदन केंद्रवर तब्बल दोन सीआरपीएफ कंपनी तसेच 1 हजार पोलीस तैनात असणार आहेत. त्यात 600 उत्तर गोवा जिल्हा पोलीस तर 400 आयआरबी आणि वाहतूक पोलिसांचा समावेश असणार आहे. दक्षिण होवा मतमोजणी केंद्रावर एक सीआरपीएस कंपनीसह एकूण 650 पोलीस तैनात असतील. त्यात 400 दक्षिण गोवा जिल्हा पोलीस तर 192 वाहतूक पोलीस, दोन आयआरबी कंपनीचा समावेश असणार आहे.

गोव्यातील दोन्ही जागांसह एनडीए 400 पार

गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला देशभरात 400 जागा मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. त्यात गोव्याच्या दोन्ही जागांचा समावेश असेल, अशी खात्रीही त्यांनी वर्तवली आहे.

त्यांनी सांगितले की ‘एक्झिट पोल’ हा एक अंदाज असतो आणि तो अंदाज काँग्रेसने नाकारून आपली हार मान्य केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीस 350 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा बहुतेक एक्झिट पोलचा अंदाज आहे. तो अंदाज खरा ठरेल आणि देशात 400 जागा आघाडीस निश्चितपणे मिळतील.  ‘अब की बार 400 पार’ असे ध्येय ठेवून भाजपने शिस्तबद्द प्रचार मोहीम राबवली होती, तिचे यश निकाला मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.